AYUSH-64 श्री श्री तत्वातर्फे आयुष-64 औषधांचा शुभारंभ

कोविडच्या सौम्य ते मध्यम लक्षणे असलेल्यांसाठी लाभदायक, श्री श्री तत्त्वा संस्थेची ऑनलाईन पत्रकार परिषदेत माहिती AYUSH-64

श्री श्री तत्त्व’  या संस्थेने  ’आयुष्य ६४’ या नावाने  तयार केलेल्या आयुर्वेदिक गोळ्या बाजारात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.   सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या कोविड – 19 च्या रुग्णांसाठी हे औषध आयुष मंत्रालयाकडून प्रमाणित केले गेले आहे.   नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनआरडीसी) कडून यासाठी तंत्रज्ञान प्राप्त झाले असून  हे औषध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर  निर्मित आणि वितरित केले जाईल, अशी माहिती  श्री श्री तत्त्व’  या संस्थेने  दिली.  Sri Sri Tattva Launches AYUSH-64 Anti-viral Medicine For Mild To Moderate COVID Treatment

’आयुष्य ६४’ या औषधांचा आभासी पद्धतीने घेतलेल्या ऑनलाईन पत्रकार परिषेदेच्या माध्यमातून शुभारंभ करण्यात आला आहे. याप्रसंगी आयुष मंत्रालयाचे सचिव पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा, श्री श्री तत्वाचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद वर्चस्वी आदी उपस्थित होते.

लक्षणे विरहित, सौम्य आणि मध्यम स्वरूपाच्या कोविड -19 आजारावर नियंत्रण करण्यात मानक ठरलेले हे औषध विविध वैद्यकीय तपासण्यात गुणकारी असल्याचे सिद्ध झाले आहे. या औषधाचे इन- सिलिको परीक्षणात ३६ पैकी ३५ फायटो घटक कोविड -19 ला प्रतिबंध करणारे आढळले आहेत, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

श्री श्री तत्वा ब्रँडच्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या इतर लोकप्रिय उत्पादनासोबत आता आयुष -64 औषधाचा समावेश झाला आहे. कबासुर कुदिनीर, अमृत, टर्मेरिक प्लस, शक्ती ड्रॉप्स, तुलसी अर्क आणि च्यवनप्राश ही औषधे आधीपासूनच लोकप्रिय असल्याचे श्री श्री तत्त्वाकडून सांगण्यात आले.

यावेळी श्री अरविंद वर्चस्वी म्हणाले की, कबासुर कुदिनीर हे औषध  जागतिक महामारीत लक्षावधी लोकांसाठी आधार ठरले आहे. सध्या ’आयुष्य ६४’ हे लाभ देणारे  औषध बाजारात आणत आहोत. हे साध्य करण्यासाठी व अधिकाधिक गरजू लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही वनएमजी या कंपनीसोबत भागीदारी केली आहे.

यावेळी आयुष सचिव वैद्य श्री राजेश कोटेचा म्हणाले की, “हे औषध कोविड -19 च्या उपचारासाठी असून त्याच्या सात विविध कठोर वैद्यकीय चाचण्या केल्या गेल्या आहेत. तसेच इतर गणमान्य आरोग्य संस्थांनी याच्या चाचण्या केल्या आहेत.”

“आयुष मंत्रालय आणि सीसीआरएएस या आयुष 64 औषधावर आवश्यक त्या चाचण्या करीत असतानाच हे उत्पादन मोठ्या प्रमाणावर निर्माण करुन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे वितरण करण्यास उद्योग क्षेत्राचे सहकार्य गरजेचे आहे” असे युसीजीचे माजी उपाध्यक्ष  भूषण पटवर्धन म्हणाले.

वनएमजीचे सह संस्थापक श्री विकास चौहान म्हणाले की ‘शुद्धता का नाम’ ही टॅग लाईनच दर्शविते की एखादी योग्य गोष्ट चांगल्या हेतूने ग्राहक, रुग्ण यांना केंद्रित ठेवून केली तर ती यशस्वी होतेच. आणि ग्राहक लाभान्वित व्हावा याच उद्देशाने आम्ही ही भागीदारी करत आहोत.AYUSH-64

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.