ylliX - Online Advertising Network

देवर्षी नारद व्‍यंगचित्रकारिता गौरव पुरस्‍काराने राजेंद्र सरग सन्‍मानित  

देवर्षी नारद व्‍यंगचित्रकारिता गौरव पुरस्‍काराने राजेंद्र सरग सन्‍मानित  

 नाशिक  – जिल्‍ह्यातील नांदगाव येथील व्‍यंगचित्रकार राजेंद्र सरग यांना देवर्षी नारद व्‍यंगचित्रकारिता गौरवपुरस्‍कार खासदार डॉ. सुब्रम्‍हण्‍यम स्‍वामी यांच्‍या हस्‍ते पुण्‍यात प्रदान करण्‍यात आला. पुण्‍याच्‍या विश्‍व संवाद केंद्र,पश्चिम महाराष्‍ट्र, आणि डेक्‍कन एज्‍युकेशन सोसायटी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने हा पुरस्‍कार देण्‍यात येतो. राजेंद्र सरग आणि त्यांची पत्‍नी कल्‍पना यांनी हा पुरस्‍कार स्‍वीकारला. शाल, श्रीफळ, स्‍मृतिचिन्‍ह आणि रोख रक्‍कम असे या पुरस्‍काराचे स्‍वरुप आहे. 

डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, विश्वसंवाद केंद्राचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी, उपाध्यक्ष विकास काकतकर, प्रा. आनंद भिडेज्येष्ठ संपादक भाऊ तोरसेकर, पराग पोतदार, देवीदास देशपांडे  आदी उपस्थित होते.  कार्यक्रमाचे  प्रास्‍ताविक  केंद्राचे अध्‍यक्ष मनोहर कुलकर्णी यांनी केले. डॉ. शरद कुंटे प्रमुख पाहुण्‍यांचे स्‍वागत केले.  

      राजेंद्र सरग यांचे प्राथमिक व महाविद्यालयीन शिक्षण नांदगाव येथेच झाले असून महाविद्यालयात असतांनाच 1987 पासून व्‍यंगचित्रकारितेत कार्यरत आहेत. त्‍यांची विविध दैनिके, दिवाळी अंकांतून 11 हजारांहून अधिक व्‍यंगचित्रे प्रसिध्‍द झाली आहेत.  ते सध्‍या पुणे येथे जिल्‍हा माहिती अधिकारी म्‍हणून सेवेत आहेत.

त्‍यांनी यापूर्वी  लातूर, बीड, परभणी आणि अहमदनगर येथे जिल्‍हा माहिती अधिकारी म्‍हणून सेवा बजावली आहे.  शासकीय सेवा करीत असतांना व्‍यंगचित्रकलेचा छंद जोपासल्याबद्दलही त्‍यांना विविध पुरस्‍काराने गौरवण्‍यात आले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.