ylliX - Online Advertising Network

Navratri festival सप्तशृंगी गडावरचा शारदीय नवरात्रोत्सव रद्द

नाशिक : प्रतिनिधी साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ असलेल्या सप्तशृंगी गडावरील आदिमाया सप्तशृंगीचा येत्या १७ ऑक्टोबरपासून सुरु होणारा शारदीय नवरात्रोत्सव आणि त्यानिमित्ताने भरणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर यात्रा कमिटीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सप्तशृंगीगडावर प्रशासनाच्या सर्व विभाग प्रमुखांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. Navratri festival
दरवर्षी नवरात्रोत्सवात सुमारे चार ते पाच लाख भाविक पदयात्रेने तसेच कावड यात्रेसाठीही एक ते दीड लाख कावडीधारक राज्यासह, मध्यप्रदेश, गुजरात राज्यातून विविध ठिकाणाहून वेगवेगळ्या नद्यांचे पवित्र जल कावडीद्वारे शेकडो-हजारो किलोमीटरचा अनवानी पदयात्रेने प्रवास करुन येतात.  कोजागिरीच्या दिवशी आदिमायेचा कावडीने आणलेल्या जलाचा महाअभिषेक घालतात. दोन लाखांवर पदयात्रेकरु कावडीधारकांसोबतच कोजागिरी पौर्णिमा, कावडयात्रेसाठी सहभागी होत असतात. तसेच कोजागिरी पौर्णिमेस तृतीयपंथीयांची छबिना उत्सवही मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या दिवशी राज्यासह देशभरातून तृतीयपंथीयांचे गुरुंसह तीन ते चार हजार तृतीयपंथी गडावर येवून छबिना मिरवणूक काढतात. या  नवरात्र व कोजिगीरी पौर्णिमा उत्साहात पंधरा ते वीस लाखांवर भाविक दरवर्षी गडावर हजेरी लावून आदिमायेचरणी नतमस्तक होतात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव व कावडयात्रोत्सव रद्द केल्याने भाविक व कावडीधारकांची वर्षानूवर्षांची गडावरील पालखी, कावड, पायीवरीची परंपरा खंडीत झाली आहे.
दरम्यान नवरात्रोत्सव काळातील नियमित धार्मिक विधी, होमहवन पुजा, कीर्तीध्वज पुजन व ध्वजारोहन, दसरा उत्सव आदी कार्यक्रम कोविड संदर्भातील अत्यावश्यक नियमावली पाळून व नेमूण दिलेल्या पुरोहितांच्या उपस्थित  संपन्न होणार आहे. तसेच पदयात्रोकर व कावडीधारक गडावर येवू नये यासाठी प्रशासनाच्यावतीने तालुकासीमा व गडावरील येणारे रस्ते सील करण्याबाबत प्रशासनास सुचना देण्यात आल्या आहे. तसेच नवरात्रोत्सव व कावड यात्रेसाठी सप्तशृंगी गडावर न येता आपल्या घरीच आदिमायेची घटस्थापना व पुजा विधी करुन दर्शन घेवून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.Navratri festival
ऑनलाईन दर्शन मिळणार
कोरोना या जागतिक महामारीमुळे जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रशासन अहोरात्र प्रयत्न करून या महामारीचा सामना करत आहे. येत्या १७ तारखेपासून नवरात्रोत्सव सुरू होत असून राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या आधारे यंदा हा उत्सव आपण साजरा करू शकत नाही; मात्र भाविकांची श्रद्धा लक्षात घेता विश्वस्त मंडळाने सोशल मीडिया, दूरचित्रवाणीद्वारे  देवीचे दर्शन ऑनलाईन सुरू करण्याबाबत उपाययोजना कराव्यात असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे.
ते आज मौजे सप्तश्रृंगी गड येथे झालेल्या राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे या वर्षीचा नवरात्रोत्सव कसा असावा याबाबत नियोजन बैठकित अध्यक्षीय भाषणात बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक सचिन पाटील, पोलिस उपअधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपविभागीय अधिकारी विकास मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी भीमाशंकर ढोले, तहसीलदार बी.ए. कापसे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकरी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, रोप वे प्रकल्प व्यवस्थापक राजीव लुम्बा, उपसरपंच राजेश गवळी, विश्वस्त मंडळाच्या उपसमिती सदस्य विपुल गुरव, अजय दुबे, संदीप बेनके, सूरज बत्तासे, तुषार बर्डे आदी उपस्थित होते.
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.