लासलगाव गटाचे जि प सदस्य तथा भाजपचे लासलगाव मंडल अध्यक्ष ज्ञानेश्वर किसन जगताप यांच्यावर थेटाळे येथील त्यांच्या फार्महाऊसवर अज्ञात इसमांनी लाकडी लाठ्या काठ्यानी प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री ९ वाजेच्या दरम्यान घडली असून या प्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात भादवि कलम १४३,१४७,१४९,३४१,३२४,४२७,४४८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ZP member
या बाबत प्रकाश दायमा यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार व पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर जगताप व त्यांच्या सोबत असलेले त्यांचे मित्र प्रकाश दायमा हे सोमवारी रात्री ९ वाजेच्या दरम्यान जगताप यांच्या थेटाळे येथील फार्महाऊसवरून कामकाज आटोपून ज्ञानेश्वर जगताप स्वतः चालवीत असलेल्या त्यांच्या मालकीच्या फोर्ड कंपनीच्या गाडी क्र एम एच १५ एच सी ८५८५ मध्ये बसुन लासलगाव कडे येण्यास निघाले असता या ठिकाणी काही अज्ञात इसम फार्महाऊसचा मुख्य दरवाजा आडवुन बंद करतांना ज्ञानेश्वर जगताप यांना दिसले म्हणून जगताप यांनी त्यांच्या वाहनाची काच खाली करुन फार्महाऊसवर असलेल्या कामगारांना आवाज दिला त्यावेळी त्याठिकाणी वरील अज्ञात इस्मानी त्यांचे काही सहकारी जमवुन अज्ञात कारणावरुन त्यांच्या हातात लाकडी दांडे घेवुन येवुन मोठ- मोठयाने ओरडुन ज्ञानेश्वर जगताप यांच्यावर अचानक हल्ला करून उजव्या बाजुस खांदयावर व मानेवर लाकडी दांडयाने मारहाण करुन जबर दुखापत केली तसेच वाहनाची काच फोडुन नुकसान केले.
या घटनेनंतर ज्ञानेश्वर जगताप यांना तातडीने पुढील उपचारासाठी नाशिक येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणी पुढील तपास लासलगाव चे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पो उ नि सोनवणे,स पो उ नि देविदास लाड व पोलीस पथक करत आहे ZP member