ylliX - Online Advertising Network

मोदींच्या राज्यात प्रश्न विचारायला बंदी, देशद्रोही आहे मग मी तुरांगाबाहेर कसा–कन्हैया कुमार  

प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही, व्यवस्थेला प्रश्न विचारले पाहिजे

नाशिक : देशात सध्या प्रश्न विचारले जाऊ देत नाही. कोणी विचारले तर त्याला देशद्रोही म्हटले जाते. नागरिकांना तर सत्य माहीतच नाही, माध्यमे यांच्या मालकीची आहेत. त्यामुळे देशात काय सुरु आहे त्याबाबत आम्ही प्रश्न विचाराणारच. मी जर देशद्रोही असतो तर जेलमध्ये असतो मात्र आज मी बाहेर आहे. हा माझा देश असून मी प्रश्न विचारणारच, असे मत कन्हैया कुमार मांडले आहे. परशुराम सायखेडकर नाट्यगृह येथे डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेत बोलताना कन्हैया कुमारने आपले विचा व्यक्त केले आहे. ज्या परशुराम सायखेडकर सभागृहात कार्यक्रम होता तेथे पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवला होता. asking questions not crime our government should answer questions kanhaiyya kumar

देशात हिंदू मुसलमान यांच्या विरोधात वातावरण तयार केले जाते आहे. मुख्य प्रश्न काय आहेत त्याच्याकडे लक्ष जावू नये म्हणून असे केले जातेय. देशात सरकार पंतप्रधान यांच्या विरोधात कोणालाही बोलू दिले जात नाही. देशात जर सर्व समान आहेत तर संविधानाने नागरिकांना अधिकार दिलाय तो प्रश्न विचारण्याचा. तो आम्ही विचारणार आहे. तुम्हाला फक्त मोदी आणि राहुल दाखवतात तेच दोघे आहेत असे दाखवतात मात्र नागरिकांचे प्रश्न दाखवत नाहीत. तुम्ही जर डोळसपणे पाहिले तर देशात पंतप्रधान यांची निवडणूक नाही तर देशात लोकप्रतिनिधी यांच्या साठी निवडणूक आहे. मात्र चित्र असे की देशात पंतप्रधान यांची निवडणूक आहे असे मत कन्हैया कुमार ने व्यक्त केले आहे.

देशात नाल्यातून गॅस निघतो तो दिसतो, चहावाला दिसतो मात्र अनेक वर्ष त्याचा नाल्यात पडून साफ करणारा कर्मचारी दिसत नाही, त्यात हजारो मेले ते दिसत नाही. आपल्याला प्रश्न पडू नये म्हणून घोड्याला जसे झापड असते तसे झापड लावले गेले आहे. जसे ते सांगतील तेव्हडेच करायचे प्रश्न विचारायचे नाहीत. राम मंदिर बांधणार म्हणून सहा हजार कोटी जमा केले मात्र मंदिर राहिले बाजूला भाजपाचे मुख्य कार्यालय बांधले गेले आहे. मात्र आपल्याला हे दिसू देत नाहीत, मुल प्रश्न बाजूला ठेवतात आणि सत्ता गाजवतात. asking questions not crime our government should answer questions kanhaiyya kumar

मी जर कन्हैया कुमार अंबानी असतो तर मला सरकारला समजून सांगायला इतका वेळ लागला नसता, मात्र मी अंबानी नाही. त्यामुळे सरकार माझे ऐकणार नाही. नेहमी माझे वय, शिक्षण विचातात मात्र स्वतःचे सांगत नाही. मी काही प्रश्न विचारला तर भलतेच प्रश्न विचारून सभ्रम तयार केला जातो. आपण व्यवस्थेला प्रश्न विचारला पाहिजे. असा उमेदवार निवडून  द्या की जो आपले प्रश्न मांडेल आणि सोडेल असे कन्हैया कुमार ने उपस्थिताना सांगितले.

asking questions not crime our government should answer questions kanhaiyya kumar
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.