ylliX - Online Advertising Network

अशोक दुधारे यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असो.च्या कार्यकारी मंडळावर निवड

नाशिकला प्रथमच मोठी संधी

नाशिक : नाशिकमधील आघाडीचे क्रीडा मार्गदर्शक अशोक दुधारे यांची महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारी सदस्य म्हणून निवड झाली आहे. नाशिक शहरातून प्रथमच महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशन मध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या संघटनेच्या अध्यक्ष पदी फेरनिवड झाली असून अजित पवार यांच्या नेतृत्वात हे १२ शिलेदार आता महाराष्ट्राच्या ऑलिम्पिक असोसिएशनचे कामकाज बघणार आहेत. या नव्या कार्यकारिणीत ८ जणांची फेरनिवड झाली असून तीन सदस्यांची पुधीच चार वर्षापर्यंत (२०१७ ते २०२१) नव्याने निवड करण्यात आली आहे. या निवड प्रक्रियेकरिता निवडणूक अधिकारी म्हणून बी.डी. कदम यांची नेमणूक करण्यात आली होती.

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनशी संलग्न असलेल्या सर्व राज्यांच्या संघटनासारखी  महाराष्ट्र राज्याची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन ही संघटना आहे. या कार्यकारणीमध्ये काम कारणासाठीएकूण १४ लोकांनी नाव नोंदणी केली होती. मात्र यामधून मॉडर्न पेन्टॅथलॉन संघटनेचे नामदेव शिरगावकर यांनी माघार घेतल्यामुळे आणि राज्य फुटबॉल संघटनेचे किरण चौघुले यांचा अर्ज बाद झाले. यामुळे या बारा नावावर सर्वानुमते सन  २०१७ ते २०२१ या  पुढील चार वर्षाकरिता महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे कामकाज करण्याकरीता निवड जाहीर अनौपचारिकरीत्या करण्यात आली आहे. या नवीन कार्यकारिणीची औपचारिक घोषणा ठरलेल्या कार्यक्रमानुसार २५ मार्च  रोजी केली जाणार आहे अशी माहिती निवडणूक अधिकारी बी. डी. कदम यांनी दिली.

अशी आहे नवी कार्यकारिणी

अध्यक्ष : अजित पवार

उपाध्यक्ष : प्रल्हाद सावंत ( ऍथलेटिक्स ), अशोक पंडित(नेमबाजी ), प्रदीप गंधे (बॅडमिंटन), जय कवळी (बॉक्सिंग)

सरचिटणीस : बाळासाहेब लांडगे (कुस्ती )

सहचिटणीस : प्रकाश तुळपुळे (टेबल टेनिस ) आणि महेश लोहार (वेटलिफटिंग)

खजिनदार : धनंजय भोसले (ज्युदो )

सदस्य : चंद्रजीत जाधव (खो-खो),  प्रशांत देशपांडे ( धर्नुविद्या), मुजताब लोखंडवाला(रोईंग), सुंदर आय्यर (लॉन टेनिस). अमरिया झुबीन सॅम (जलतरण), अशोक दुधारे (तलवारबाजी ), अमीन दयानंदकुमार (ट्रायथलॉन ) आणि विजय संतान (व्हॉलीबॉल)

या संघटनेच्या आठ कार्यकारी सदस्यसदस्यापैकी पाच जणांना पुन्हा संधी मिळाली असून तीन नवीन चेहेऱ्यांना संधी देण्यात आली  आहे.

या बारा  जणामध्ये अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राचे माजी मंत्री तथामहाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे  विद्यमान अध्यक्ष अजित पवार यांची फेर निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष म्हणूनही मागील कार्यकारिणीतील प्रल्हाद सावंत ( ऍथलेटिक्स ), अशोक पंडित(नेमबाजी ), प्रदीप गंधे(बॅडमिंटन आणि  जय कवळी (बॉक्सिंग)यांची निवड झाली आहे.  सरचिटणीस म्हणून विद्यमान सरचिटणीस बाळासाहेब लांडगे (कुस्ती ) यांची फेर निवड करण्यात आली आहे,  तर  सहचिटणीस म्हणून प्रकाश तुळपुळे (टेबल टेनिस ) आणि महेश लोहार (वेटलिफटिंग) या दोघांची निवड करण्यात आली आहे. या संघटनेचे खजिनदार म्हणून विद्यादान खजिनदीर धनंजय भोसले (ज्युदो ) यांची फेरनिवड झाली आहे.   यामध्ये नाशिकचे अशोक दुधारे (तलवारबाजी ), अमीन दयानंदकुमार (ट्रायथलॉन ), आणि विजय संतान (व्हॉलीबॉल)  या तिघांचा नव्याने प्रवेश झाला असून मागील कार्यकारिणीतील पाच कार्यकारणी सदस्य अनुक्रमे  चंद्रजीत जाधव (खो-खो),  प्रशांत देशपांडे ( धर्नुविद्या), मुजताब लोखंडवाला(रोईंग), सुंदर आय्यर (लॉन टेनिस). अमरिया झुबीन सॅम (जलतरण) यांची फेरनिवड झाली आहे.

नाशिकचा खेळातील इतिहास बघता नाशिकला प्रथमच अश्या मोठया संघटनेत महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनवर काम करण्याची संधी अशोक दुधारे यांच्या निवडीमुळे मिळाली आहे. अशोक दुधारे हे गेल्या २५- ३० वर्षांपासून संघटनांवर काम करत असून त्यांना महाराष्ट्र शासनाचा शिव छत्रपतीं क्रीडा संघटक पुरस्कार आणि शिव छत्रपतीं क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार हे दोन्ही मनाचे पुरस्कार मिळालेले आहेत. सध्या ते भारतीय तलवारबाजी संघटनेचे सरचिटणीस म्हणून काम करत आहेत. अशोक दुधारे यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनवर  निवड झाल्याबद्दल त्यांचे नाशिकच्या क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.