भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे 16 ऑगस्टला निधन झाले. त्यांची अस्थिकलश यात्रा शुक्रवार 24 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता वसंतस्मृती येथून निघणार असून नंतर रामकुंडावर अस्थिंचे विधीवत विसर्जन करण्यात येणार आहे. यावेळी अस्थिकलश यात्रेत पालकमंत्री गिरीष महाजन हे सहभागी होणार आहेत. ashes Atal Bihari Vajpayee immersed Godavri river Ramkund nashik Bjp
अस्थिकलश यात्रेचा मार्ग वसंतस्मृती, अण्णाभाऊ साठे चौक (जीपीओ समोर ), डॉ. आंबेडकर चौक (गंजमाळ सिग्नल), स्व.इंदिरा गांधी चौक (शालीमार) शिवाजीरोड, संत गाडगे महाराज चौक (मेनरोड), गो.ह.देशपांडे पथ (मेनरोड), रविवार कारंजा, अहिल्यादेवी होळकर पूल, मालेगांव स्टँड, पंचवटी कारंजा, मालविय चौक, रामकुंड असा राहील.