Gahana Vasishta पोर्नोग्राफी प्रकरणात अटक कोण आहे गहना वसिष्ठ ?  

अश्लील चित्रपट बनवून ऑनलाइन विकण्याच्या रॅकेटमध्ये मुंबई पोलिसांनी अभिनेत्री गेहना वसिष्ठला अटक केली. गहनावर ८५ पेक्षा जास्त अश्लील चित्रपट बनवल्याचा आणि ते मोबाइल अ‍ॅपवर विकल्याचा आरोप आहे. गहना याआधीही तिच्या अश्लील चित्रपटांमुळे चर्चेत आली होती. आज आपण जाणून घ्या गहना वसिष्ठ कोण आहे आणि तिने आतापर्यंत काय केलं ते जाणून घेऊ.. Arrested in pornography case Who is Gahana Vasishta? miss Asia Bikini Photo

गहनाचं मूळ नाव वंदना तिवारी आहे. गहनाचा जन्म १६ जून १९८८ रोजी झाला होता. तिचे वडील रवींद्र तिवारी हे शिक्षणाधिकारी आहेत. ती मध्य प्रदेशमधली राहणारी आहे. मॉडेलिंगमध्ये आल्यानंतर तिने स्वतःचं नाव वंदना तिवारी बदलून गहना वसिष्ठ ठेवलं. आता तिला सर्व गहना याच नावाने ओळखतात. गहनाचे मित्र-मैत्रिणी तिला ‘जिंदगी’ या नावानेही हाक मारतात.

 

कॉम्प्यूटर सायन्समधून इंजिनिअरींग…

गहना वसिष्ठचे खरे नाव वंदना तिवारी आहे. (Vandana Tiwari, known by her stage name Gehana Vasisth) तिचा जन्म छत्तीसगडमधील चिमरी गावात झाला. तिची आई गृहिणी असून वडील शिक्षणाधिकारी होते. गहनाला तिचे मित्र जिंदगी नावाने बोलवतात. गहनाने कॉम्प्यूटर सायन्समधून इंजिनिअरींगची पदवी मिळवली आहे. भोपाळमधील महाविद्यालयातून तिने इंजिनिअरींचे शिक्षण पूर्ण केले.

गहनाला झाली होती मारहाण…

तिला सुरुवातीपासूनच अभिनय आणि मॉडेलिंगची आवड होती. तिने २०१२ मध्ये मिस आशिया बिकिनी किताब जिंकला. गहना अनेकवेळा तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आली. एका फोटोशूटमुळे तिला मारहाण देखील झाली होती. २०२० मध्ये गहना वशिष्ठ पहिल्यांदा चर्चेत आली जेव्हा तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

गहनानं या व्हिडिओत आपल्या कमरेखाली तिंरगा लपटेला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर मुंबईत काही लोकांनी तिला मारहाण केली. या व्हिडिओवर गहनानं म्हटलं होतं की तो व्हिडिओ तिच्या मित्राने अपलोड केला होता. मात्र, हा के‍वळ पब्लिसिटी स्टंट असल्याचे नंतर समोर आले.

२०१९ मध्ये गहना शुटिंग दरम्यान गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही न खाता-पिता तिने शुटिंग केल्याने ती बेशुद्ध होऊन पडली. त्यानंतर तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.

क्रिकेट अँकर म्हणून चर्चेत…

गहनानं ‘फिल्मी दुनिया’ चित्रपटातून इंडस्ट्रीत पर्दापण केलं. तिने तेलुगू चित्रपटांतही काम केले आहे. अल्ट बालाजीची वेब सीरिज ‘गंदी बात’ मध्ये देखील ती दिसून आली. त्याशिवाय तिने ‘बहनें’ या टीव्हीवरील मालिकेत काम केले. तिने आतापर्यंत ७०-८० जाहिरातींमध्ये काम केले आहे.

त्याशिवाय तिने सुमारे ३० दाक्षिणात्य चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. तिने क्रिकेट वर्ल्डकप २०१५ दरम्यान योगराज सिंह आणि अतूल वासन यांच्यासोबत अँकर म्हणून एक शो होस्ट केला होता. हा शो खूप गाजला होता.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.