ylliX - Online Advertising Network

एप्रिल फूल काय कोणतेच फूल करू नका आफवा पसरवली की गुन्हा दाखल होणार

विषय – महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ६८ अन्वये व्हॉटस्अॅप, फेसबूक इत्यादीसोशल मिडीयाचे व्दारे प्रसारीत होणारे दिशाभुल व अफवा पसरविणारे मेसेजेसबाबत मनाई आदेश
१) ज्याअर्थी कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रसार संपूर्ण महाराष्ट्रात वेगाने होत आहे. नाशिक जिल्हयातदेखील कोरोना विषाणूने संसर्गग्रस्त एका रूग्णाचे उपचार चालू आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तकार्यालयामार्फत दि. २३/०३/२०२० रोजी पासून सीआरपीसी १४४ (१)(३) प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेशनिर्गमित करण्यात आले आहेत. तसेच संपूर्ण देशात लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे.त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीच्या दैनंदिन जीवनकमात महत्वपूर्ण बदल घडून आलेले आहेत. दरम्यानच्याकाळात वेगवेगळया प्रसार माध्यमे, सोशल मिडीया यातून विविध प्रकारची माहिती प्रसारीत होत आहेत.यातून बऱ्याचदा खात्री न करता चुकीचे मेसेजेस देखील प्रसारीत होताना दिसून येत आहेत. उद्या दि. ०१एप्रिल रोजी ‘एप्रिल फुल’ म्हणुन वेगवेगळे तसेच दिशाभूल करणारे, खोटी माहिती पसरवणारे विनोदीतसेच अतिरंजित स्वरूपाचे मेसेजेस तयार करण्यात येतात. तसेच असे मेसेजेस व्हॉटस्अॅप, फेसबूकइत्यादी सोशल मिडीयाचे व्दारे प्रसारीत करण्यात येण्याची शक्यता आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.