Kovishield vaccine दोन स्वयंसेवकांना ‘कोविशिल्ड’ लसीचा डोस, नाशिकचे आणखी एक आमदार बाधित

पुण्याच्या भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये दोन स्वयंसेवकांना ‘कोविशिल्ड’ लसीचा डोस देण्यात आला. ऑक्सफर्डच्या लसीची देशातील पहिली मानवी चाचणी पुण्यात करण्यात आली अशी माहिती डॉ. संजय ललवाणी यांनी दिली. या दोन स्वयंसेवकांना ०.५ एमएलचा डोस देण्यात आला.Kovishield vaccine

यावेळी प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीत डॉक्टरांनी पात्र ठरलेल्या दोन स्वयंसेवकांना करोना लसीचा डोस दिला. आधी आवश्यक वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर हा डोस देण्यात आला.

लसीचे काही साईड इफेक्ट होतात किंवा नाही हे तपासण्यासाठी या दोन्ही स्वयंसेवकांना काही तास रुग्णालयात थांबावे लागणार आहे. पुढचे काही दिवस या स्वयंसेवकांच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेऊन असणार आहेत. २८ दिवसानंतर लसीचा दुसरा डोस दिला जाईल.

आमदार माणिकराव कोकाटे यांना कोरोना  

सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. कोकाटे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

दरम्यान, यापूर्वी आमदार सरोज अहिरे, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार नरेंद्र दराडे यांचे देखील कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांनी आता कोरोना संसर्गावर मात केली आहे. त्या पाठोपाठ आता कोकाटेंचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोकाटे यांना सौम्य लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी कोरोना टेस्ट केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेतील विश्वसनीय सूंत्रानी दिली आहे. सध्या त्यांना होम क्वारंटाइन राहण्यास सांगितले आहे.Kovishield vaccine

The Serum Institute of India’s phase 2 trials for Covishield vaccine developed by the University of Oxford started on Tuesday, with the first patients screened by the Bharati Vidyapeeth Deemed University (BVDU) Medical College and Hospital in Pune. This is a big step forward in the development of the vaccine and gives hope to people in the struggle to contain the covid-19 pandemic.

Pune-based Serum Institute is the third firm to conduct human trials of a covid-19 vaccine in India after Bharat Biotech (for Covaxin) and Zydus Cadila (for ZyCoV-D) started phase 1 and 2 trials last month.

“Today, we have screened some patients. Tomorrow, we will get their covid antibody test reports and if they are negative we will inoculate them with the Covishield vaccine,” said Sanjay Lalwani, principal investigator for the hospital.

The hospital aims to have 300-350 participants as part of the vaccine trial.Kovishield vaccine

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.