नाशिकमध्ये आणखीन एक कोरोना रुग्ण Video

नाशिकमध्ये आणखीन एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला आहे. याबाबत जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी माहिती दिली आहे. सदरच्या संशयिताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल जिल्हा रुग्णालयात प्राप्त झाला. यात तो कोरोना विषाणु बाधित असल्याचा निष्कर्ष अहवालात आलेला आहे. त्यामुळे आता नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दोन झाली आहे.

लवकर समोर या जे दिल्ली किंवा बाहेरून आले आहेत । दुसरा कोरोना पॉझिटिव्ह ।जिल्हाधिकारी यांची माहिती#nashikonWeb

Posted by Nashik On Web on Monday, 6 April 2020
video – लवकर समोर या जे दिल्ली किंवा बाहेरून आले आहेत.
दुसरा कोरोना पॉझिटिव्ह. जिल्हाधिकारी यांची माहिती

सदरचा रुग्ण नाशिक शहरातील मनोहर नगर येथील असून ४४ वर्षीय आहे. आग्रा येथे रेल्वेच्या कॉन्ट्रक्टच्या संदर्भात गेलेला होता. त्याला पोलिस आयुक्त यांच्याकडुन प्राप्त झालेल्या यादीनुसार महानगरपालिकेच्या आरोग्य पथक व पोलिस पथकाने घरी जाऊन दिनांक 8 रोजी डॉ. झाकीर हुसेन महानगरपालिका रुग्णालय नाशिक येथे उपचारासाठी दाखल केले होते.

त्याच्या घशातील सावाचे नमुने तपाराणीसाठी पुणे येथे पाठविण्यांत आले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असुन तो कोरोना विषाणु बाधित असल्याचा निष्कर्ष आलेला आहे. सदर रुग्णाची तब्येत स्थिर असुन त्याला कोरोना आजारासंबंधी येथील तज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडुन उपचार करण्यात येत आहे. या अनुषंगाने नाशिक महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत विशेष काळजी घेण्यात येत आहे.

याआधी निफाड तालुक्यातील ३० वर्षांच्या तरुणाला कोरोनाची लागण झाली. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या संनियंत्रणानुसार कोरोना विषाणु पॉझीटीव्ह रुग्णाच्या घराच्या परिसरातील घरातील व्यक्तींचे साथरोग सर्वेक्षण पथकामार्फत सुरु करण्यात आले आहे.

तसेच या सर्व परिस्थितीवर विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य सेवेतील  डॉक्टर, कर्मचारी कारोना साथीच्या नियंत्रणासाठी लक्ष ठेवून आहेत. नागरीकांनी घाबरुन जावु नये, घराबाहेर पडु नये, हात वारंवार साबणाने स्वच्छ धुवावे आपले हात नाक, तोंड, डोळे यांना लावण्याचे टाळा असे आवाहन प्रशासनाने नाशिककरांना केले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.