अंकुश शिंदे यांची नाशिकच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाली
नाशिक शहराचे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे आणि नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांची बदली झाली आहे. अंकुश शिंदे यांची नाशिकच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. यासह विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्या जागी नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी सुनील फुलारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ankush shinde nashik cp
पिंपरी- चिंचवडचे मावळते पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली नाशिक येथे पोलीस आयुक्तपदी झाली आहे. तर, पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयाची सूत्रे विनयकुमार चौबे हे हाती घेणार आहेत. एप्रिल महिन्यात आयपीएस कृष्ण प्रकाश यांच्या जागी अंकुश शिंदे यांची वर्णी लागली होती. अवघ्या आठ महिन्याच्या कालावधीत अंकुश शिंदे यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करत अनेकांचे धाबे दणाणून सोडले होते. गुन्हेगारी च्या बाबत देखील चढउतार पाहिला मिळाले. दरम्यान, शनिवार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक फेक करण्यात आली होती. या प्रकरणी अंकुश शिंदे यांनी तडकाफडकी निर्णय घेऊन अकरा जणांचं निलंबन करण्यात आलं होतं. तर दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या होत्या. पोलिस आयुक्तालयात शिंदेंबाबत सुप्त नाराजी होती. राजकीय दबावापोटी शाईफेक करणाऱ्या तिघांवर खुनाचा प्रयत्न हे कलम लावल्याचा आरोप देखील त्यांच्यावर होता. नुकतंच अंकुश शिंदे हे मुंबई ला जाऊन आले आहेत. त्यामुळं त्यांच्या बदलीची जोरदार चर्चा होती. त्याला आज पूर्ण विराम मिळाला असून नाशिक येथे त्यांची वर्णी लागली आहे.
जयंत नाईकनवरे यांनी नाशिकसह सातारा, वर्धा, पुणे, मुंबई जिल्ह्यांमध्ये सेवा बजावली आहे. त्यांच्या कार्यकाळात शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी विशेष उपक्रम राबविले. यात प्रामुख्याने रात्री फिरते बॅरिकेडींग विशेष उल्लेखनीय आहे.
: शिंदे-फडणवीस सरकारने मंगळवारी ४१ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचे बदली आदेश जारी केले. यानुसार राज्यातील पुण्यासह, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, वसई-विरार, अमरावती, नाशिक या प्रमुख शहरांना नवीन पोलीस आयुक्त मिळाले आहेत. तसंच अनेक अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या करण्यात आल्या आहेत.
कोणकोणत्या अधिकाऱ्यांची कुठे झाली बदली?
अपर पोलीस महासंचालक :
- सदानंद दाते – अपर पोलीस महासंचालक, दहशतवाद विरोधी पथक, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- विश्वास नांगरे-पाटील – अपर पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई [पदोन्नतीने] (श्री. विनय कुमार चौबे यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदावर)
- मिलिंद भारंबे – पोलीस आयुक्त, नवी मुंबई [पदोन्नतीने]
- राज वर्धन – अपर पोलीस महासंचालक- नि- सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. [ पदोन्नतीने]
- विनय कुमार चौबे – पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड [पद उन्नत करुन]
- अमिताभ गुप्ता – अपर पोलीस महासंचालक, कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्र राज्य, मुंबई
- निकेत कौशिक -अपर पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई. (श्री. प्रभात कुमार यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदावर)
विशेष पोलीस महानिरीक्षक :
- शिरीष जैन – सह आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई
- संजय मोहिते – विशेष पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, यांचे कार्यालय, मुंबई.
पोलीस उप महानिरीक्षक :
- नवीनचंद्र रेड्डी – पोलीस आयुक्त, अमरावती शहर
- आरती सिंह – अपर पोलीस आयुक्त, सशस्त्र पोलीस, बृहन्मुंबई
- नामदेव चव्हाण – पोलीस उप महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे
- निसार तांबोळी – अपर पोलीस आयुक्त, वाहतूक, बृहन्मुंबई
- ज्ञानेश्वर चव्हाण – अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, बृहन्मुंबई
- रंजन कुमार शर्मा – अपर पोलीस आयुक्त, विशेष शाखा, बृहन्मुंबई
याशिवाय विनित अगरवाल, बिपिन कुमार सिंह, देवेन भारती, प्रभात कुमार, महेश पाटील या अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली असून ते अद्याप पदस्थापनेच्या प्रतिक्षेत आहेत.
अपर पोलीस महासंचालक :
- रितेश कुमार – पोलीस आयुक्त, पुणे शहर
- मधुकर पांडे – पोलीस आयुक्त, मीरा-भाईंदर वसई-विरार
- प्रशांत बुरडे – अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई
विशेष पोलीस महानिरीक्षक :
- सत्यनारायण चौधरी – पोलीस सह आयुक्त, कायदा आणि सुव्यवस्था, बृहन्मुंबई
- निशित मिश्रा – पोलीस सह आयुक्त, आर्थिक गुन्हे, बृहन्मुंबई
- प्रवीण पडवळ – पोलीस सह आयुक्त, वाहतूक, बृहन्मुंबई
- लखमी गौतम – पोलीस सह आयुक्त, गुन्हे, बृहन्मुंबई
- एस. जयकुमार – पोलीस सह आयुक्त, (प्रशासन), प्रशासन, बृहन्मुंबई
- अंकुश शिंदे – पोलीस आयुक्त, नाशिक शहर
- प्रवीण पवार – विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, कोकण
- सुनिल फुलारी – विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
पोलीस उप महानिरीक्षक :
- अनिल कुंभारे – अपर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई
- परमजीत दहिया – अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई
- विनायक देशमुख – अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई
- राजीव जैन – अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई
याशिवाय सुहास वारके, राजकुमार व्हटकर, जयंत नाईकनवरे, बी. जी. शेखर, संजय दराडे आणि विरेंद्र मिश्रा या अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली असून ते अद्याप पदस्थापनेच्या प्रतिक्षेत आहेत.ankush shinde nashik cp