आपल्याकडे जी साधने आहेत त्यांना अजिबात कमी लेखू नये. देशात दूरदर्शन हे सर्वात मोठे व्यासपीठ असून त्यामार्फत आम्ही लाखो लोकांपर्यंत आमचा विषय पोहोचवला. विशेष म्हणजे या डॉक्युमेंटरीमध्ये कोणताही प्रसिद्ध चेहरा नाही. तरीही लोकांनी याला भरभरून दाद दिली.
दुसरीकडे सोशल मिडिया रोज बदलत असून त्याद्वारे आपली गोष्ट सांगता आली तर ती नक्कीच लोकापर्यंत पोहोचणार आहे. अंकुर फिल्म फेस्टिवल सारख्यामाध्यमातून स्वतः फिल्म निर्माण करणाऱ्याला थेट लोकांपर्यंत पोहोचून संवाद साधता येतो हे फार महत्वाचे आहे असे मत प्रसिद्ध दिग्दर्शिका, लेखिका, पाणी फौंडेशनच्या सोशल मिडिया प्रमुख स्वाती चक्रवर्ती भटकळ यांनी व्यक्त केले. स्वाती यांच्या हस्ते अभिव्यक्तीच्या आठव्या अंकुर फिल्म फेस्टिवलचे औपचारिक उद्घाटन कुसुमाग्रज स्मारकात झाले.(Ankur Film )
यावेळी स्वाती चक्रवर्ती भटकळ यांची प्रसिद्ध डॉक्युमेंटरी ‘रूबरू रोशनी’ चे प्रथमच सार्वजनिक ठिकाणी स्क्रीनिंग केले आहे. ही डॉक्युमेंटरी आमिर खान प्रोडक्शनने निर्मित केली असून, नेटफ्लिक्सवर ही फिल्म उपलब्ध आहे. यावेळी फिल्म दाखवल्यानंतर त्यांनी प्रेक्षकांसोबत संवाद देखील साधला.
डॉक्युमेंटरी ‘रूबरू रोशनी’ बद्दल स्वाती म्हणाल्या की हा विषय नसून या घटना एखाद्याच्या आयुष्यात घडल्या आहेत. त्यामुळे ‘गोष्ट’ म्हणून मी त्याकडे पाहिले. मला या गोष्टी कुणाच्या तरी जीवनात घडल्या असल्याने महत्वाच्या वाटतात. त्यामुळे या मी निर्मित केल्या आहेत. या सर्व गोष्टी डॉक्युमेंटरी बघत असलेल्याच्या हृदयाला भिडतात असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अभिव्यक्तीचे अध्यक्ष संजय सावळे यांनी संस्थेची माहिती दिली. फेस्टिवल निवड समितीचे सदस्य यांनी फिल्म निवडीविषयी माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर अंकुर संयोजन समितीचे अध्यक्ष जितेंद्र पगारे आदी मान्यवर उपस्थित होते.
अनोख्या पद्धतीने उद्घाटनाची परंपरा कायम
अंकुरचे उद्घाटन कायमच अनोख्या पद्धतीने होत आले आहे. यंदा ही हीच परंपरा कायम ठेवत स्वाती यांनी ‘ तुम्ही सगळे आलाता म्हणजेच अंकुरचे उद्घाटन झाले असे सांगत फेस्टिव्हलचे औपचारिक उद्घाटन झाल्याचे जाहीर केले.(Ankur Film)
One thought on “Ankur Film सोशल मिडिया नवे माध्यम योग्य पद्धतीने गोष्टी मांडा : स्चवाती चक्रवर्ती”