ylliX - Online Advertising Network

अंकुर फिल्म फेस्टीव्हल : तीन कार्यशाळा,शंभरहून अधिक फिल्मचे सादरीकरण

६ वा ‘अंकुर फिल्म फेस्टीव्हल’, नाशिक
यंदा राष्ट्रीय पुरस्कार विजेते पद्मश्री गिरीश कासारवल्ली यांच्या हस्ते उद्घाटन
सोबतच फेस्टीव्हलमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत तीन कार्यशाळा
शंभरहून अधिक फिल्मचे सादरीकरण

नाशिक १८ नोव्हेंबर, २०१७ : दरवर्षीप्रमाणे यंदाही अभिव्यक्ती, मिडीया फॉर डेव्हलपमेंट, नाशिक यांच्याकडून ६ व्या अंकुर फिल्म फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात येत आहे. येत्या २२ ते २६ नोव्हेबर २०१७ या कालावधीमध्ये कुसुमाग्रज स्मारक, गंगापूर रोड नाशिक येथे फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात येत आहे. नेहमीप्रमाणे यंदाही दिग्गज मंडळीची उपस्थिती फेस्टिव्हलला लाभणार असून राष्ट्रीय पुरस्कार विजेते पद्मश्री गिरीश कासारवल्ली यांच्या हस्ते फेस्टिव्हलची सुरुवात होणार आहे. तर फरीदा पाशा प्रसिद्ध माहितीपटकार (MIFF-Golden Conch winner 2016) ह्या समारोपासाठी उपस्थिती राहणार आहेत. सोबतच फेस्टीवलमध्ये तीन वेगवेगळ्या विषयांवर मान्यवरांच्या कार्यशाळा होणार आहेत. हा पूर्ण फेस्टिवल नाशिकरांना खुला असून कुठलेही शुल्क नाही.

उमेश कुलकर्णी

गेल्या पाच वर्षापासून सातत्याने अंकुर फिल्म फेस्टीव्हलच्या निमित्ताने नाशिककरांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. सोबतच जागतिक पातळीवर वावरणाऱ्या अनेक दिग्गजांशी संवाद साधण्याची आणि त्याच्या फिल्मस पाहण्याची संधीही मिळाली आहे. हीच परंपरा कायम ठेवत यंदाही फिल्मच्या सादरीकरणाबरोबरच फिल्म निर्मितीवर मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. फेस्टीव्हलची सुरुवात २२ नोव्हेबरला संध्याकाळी ५ वाजता होणार आहे. यावेळी राष्ट्रीय पुरस्कार विजेते पद्मश्री गिरीश कासारवल्ली उपस्थित राहणार आहेत. यावर्षीच्या अंकुर फिल्म फेस्टीव्हलचा लोगो आणि स्मृतीचिन्ह यांचे अनावरण त्यांच्या हस्ते केले जाणार आहे. त्यानंतर समुदाय व्हिडीओचे सादरीकरण करून फेस्टिव्हलची सुरुवात केली जाणार आहे. यावेळी पद्मश्री गिरीश कासारवल्ली यांनी बनवलेली इमेज अॅण्ड रीफ्लेशन (Images and Reflections) ही फिल्म दाखविण्यात येणार आहे. त्यानंतर प्राध्यापक ॠषिकेश इंगळे, हैदराबाद युनिव्हर्सिटी गिरीश कासारवल्ली यांची प्रगट मुलाखत घेणार आहेत. तर समारोपाचा कार्यक्रम फरीदा पाशा यांच्या उपस्थितीत माय नेम इज साल्ट ( My Name is Salt) ह्या माहितीपटाच्या सादरीकरणाने होणार आहे.

प्राध्यापक ॠषिकेश इंगळे

यंदा फेस्टिव्हलमध्ये शंभराहून अधिक फिल्मसचे सादरीकरण केले जाणार आहेत. या फिल्मस माहितीपट, शॉर्ट फिल्मस आणि अॅनिमेशनपट या स्वरूपाच्या आहेत. या फिल्मस राजस्थान, दिल्ली, गुजरात,तमिळनाडू, आंध्रप्रदेश या राज्यासह सोलापूर, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, मुंबई, ठाणे, चंद्रपूर धुळे या जिल्ह्यामधून आल्या आहेत. सोबतच नाशिककरांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे. याशिवाय फिल्मस् आणि फिल्म डिविजन (MIFF) यांच्या साल २०१२ ते २०१६ या कालावधीमधील निवडक पुरस्कार प्राप्त फिल्मसचे सादरीकरण केले जाणार आहे. तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (Tata Institute of Social Sciences) यांच्या सात फिल्म देखील फेस्टीव्हलमध्ये सहभागी केल्या जाणार आहेत.

प्राध्यापक फैझ उल्ला, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स

या सर्व फिल्मसचे सादरीकरण दिनांक २३ नोव्हेंबर २०१७ पासून कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात सकाळी १०:३० ते रात्री ९ वाजेपर्यत केले जाणार आहे. तरी या फेस्टीव्हलचा लाभ नाशिककरांनी घ्यावा असे अभिव्यक्तीकडून आवाहन करण्यात येत आहे. ‘अंकुर फिल्म फेस्टीव्हल’मधील कार्यशाळाफिल्मच्या सादरीकरणाबरोबरच चांगल्या फिल्मच्या निर्मितीसाठी नवोदितांना मार्गदर्शन करण्याचे काम ही अंकुर च्या माध्यमातून केले जाते. त्यामुळेच यंदा कार्यशाळांवरही विशेष भर देण्यात आला आहे. फेस्टीव्हल दरम्यान एकूण तीन वेगवेगळ्या विषयांवर कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत.
पहिली कार्यशाळा
दिनांक २३ नोव्हेंबर २०१७, दुपारी २ ते ५.
मार्गदर्शक: प्राध्यापक ॠषिकेश इंगळे, हैदराबाद युनिव्हर्सिटी.
विषय : Film Appreciation

दुसरी कार्यशाळा
दिनांक २५ नोव्हेंबर २०१७, सकाळी १०:३० ते दुपारी ४.
मार्गदर्शक: प्राध्यापक फैझ उल्ला, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, मुंबई
विषय : Mobile Flim Making.

तिसरी कार्यशाळा
दिनांक २३ नोव्हेंबर २०१७, सकाळी ११ ते ४.
विषय : Cinematography.

‘अंकुर’ मधील इतर आकर्षणे

उमेश कुलकर्णी , कुंभ फिल्म चे सादरीकरण आणि उपस्थितांशी संवाद.
दिनांक : २४ नोव्हेंबर २०१७, सायंकाळी ८ ते ९.
या फिल्मच्या सादरीकरणासाठी प्रसिद्ध वळू,विहीर, हायवे,देऊळ या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक तसेच मसाला,पुणे ५२ या चित्रपटांचे ते निर्माते आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते उमेश कुलकर्णी यांची उपस्थिती लाभणार आहे.

जयेश आपटे , वेब सिरीजचे सादरीकरण आणि उपस्थितांशी संवाद.
दिनांक : २३ नोव्हेंबर २०१७, सायंकाळी ६ ते ८.
नाशिकमधील कला आणि कलाकार या विषयावर जयेश आपटे यांनी वेब सिरीज बनवली आहे. या वेब सिरीज मधील १२ भागांचे सादरीकरण आणि संवाद.

दीपा बक्षी , कथ्थक सादरीकरण आणि उपस्थितांशी संवाद.
दिनांक : २३ नोव्हेंबर २०१७, सायंकाळी ८ ते ९.

गिरीश कासारवल्ली

‘अंकुर’ मध्ये सहभागी मान्यवरांची ओळख
गिरीश कासारवल्ली : हे मान्यवर १४ व्या राष्ट्रीय पुरस्कार विजेते कन्नड चित्रपट दिग्दर्शक आहेत. पुण्याच्या फिल्म आणि टेलीव्हिजन इंस्टीट्युट मधुन सुवर्णपदकासह पदविका प्राप्त केल्यानंतर बी.व्ही. कारंथ यांच्या ‘योमाना डूडी’ साठी त्यांना सहाय्यक दिग्दर्शकाची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी घटश्राद्ध (१९७७), ताबराना काथे (१९८७), ताईसाहेब (१९९७), द्वीप (२००२) अशा अनेक उत्कृष्ठ आशयाच्या चित्रपटांची निर्मिती केली. त्यांच्या घटश्राद्ध या पहिल्याच चित्रपटाला सुवर्णकमळ आणि आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. गेल्या ४० वर्षांपासुन ते भारतीय चित्रपट सृष्टीचे एक महत्वाचे दिग्दर्शक आहेत. ‘कूर्मावतार’ हा त्यांचा अलीकडचा चित्रपट. गिरीश कासारवल्ली यांचे सर्वच चित्रपट मानवी मूल्यांना अधोरेखित करणारे आणि त्याकरिता सहवेदना असलेले आहेत. धार्मिक कर्मकांडे, सामाजिक रूढी, प्रथा, परंपरा, स्त्रीविषयक समाजाचा दृष्टीकोन समाजात होणारी स्थित्यंतरे टिपणारा त्यांचा सिनेमा समकालीन तर आहेच पण इतिहासात डोकावणारा सुद्धा आहे.

फरीदा पाशा

फरीदा पाशा : या मान्यवर My name is salt, The women in blue berets, धारावी, Slum for sale या माहितीपटासाठी लेखिका आणि दिग्दर्शिका म्हणुन ओळखल्या जातात. SeedKeepers या त्यांच्या माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांच्या माहितीपटाला सुवर्णकमळाने गौरवण्यात आले.
ऋषिकेश इंगळे : हे हैद्राबादमधील English and Foreign Language university मध्ये Film Studies या विषयाचे सहाय्यक प्राध्यापक आहेत. नवीन latin American Cinema या विषयात त्यांनी डॉक्टरेट केली आहे. त्यांचा भारतीय सिनेमाचा ही गाढा अभ्यास आहे. मराठी सिनेमासंबंधी त्यांचे काम Economic and Political weekly (EPW) मध्ये प्रसिद्ध झाले आहे. २००० नंतरचा बॉलिवुड सिनेमा आणि नवीन मराठी सिनेमा या विषयांवरहि ते सातत्याने लिखाण करत असतात. सिनेमा-समाज आणि संस्कृती या तीन अक्षांभोवती प्रामुख्याने त्यांचे संशोधन फिरते. त्यांना Film Making आणि विशेषत: माहितीपट निर्मीति शिकवण्याचाहि अनुभव आहे.
प्रा.फैझ उल्ला: हे मुंबई येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत school of media and cultural studies चे सहाय्यक प्राध्यापक आहेत.
उमेश कुलकर्णी : पुण्याच्या फिल्म आणि टेलीव्हिजन इंस्टीट्युटमधुन शिक्षण घेतलेले उमेश कुलकर्णी हे मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. वळू,विहीर, हायवे,देऊळ या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक तसेच मसाला आणि पुणे ५२ या चित्रपटांचे ते निर्माते आहेत. त्यांनी अनेक लघुपटांचीहि निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. गिरणी, Three of us, विजय, गरुड हे त्यांचे प्रसिध्द लघुपट आहेत. गिरणी या लघुपटासाठी त्यांना Best Non Feature Film चा राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळाला आहे. त्यांच्या देऊळ या चित्रपटाला ३ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले असुन विहीर आणि वळू हे चित्रपट बर्लिन येथील चित्रपट महोत्सवात सादर झाले आहेत.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.