ylliX - Online Advertising Network

Ankur Film Festival अंकुर फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन

 नाशिकची ओळख होऊ पाहणाऱ्या ९ व्या अंकुर फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन अभिव्यक्ती मिडीया फॉर डेव्हलपमेंटकडून करण्यात येत आहे. येत्या दिनांक ९ ते ११ डिसेंबर २०२२ या दरम्यान कुसुमाग्रज स्मारक, विद्याविकास सर्कल, गंगापूर रोड येथे रोज सकाळी १० ते रात्री ६ वाजेपर्यंत फेस्टिव्हल संपन्न होणार आहे. हा  फेस्टिवल सर्वासाठी खुला असून यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. फेस्टिव्हलचे औपचारिक उद्घाटन प्रसिद्ध माहितीपट निर्मात्या शबानी हसनवालिया, थर्ड आय, नवी दिल्ली यांच्या रात या माहितीपटाने होणार आहे. तर फेस्टीव्हलचा समारोप ९ डिसेंबरला हंसा थपलियाल माहितीपट निर्मात्या, बेंगळूरू यांच्या द आउटसाइड इन या माहितीपटाच्या सादरीकरणाने होणार आहे. फेस्टिव्हलमध्ये ५० हून अधिक फिल्मस्, माहितीपट, या कलाकृतीचे सादरीकरण होणार असून वेगवेगळ्या विषयावर कार्यशाळा देखील संपन्न होणार आहेत.Ankur Film Festival
या फेस्टिवलमध्ये नवोदित कलाकारांना, वंचित समूहांतील घटकांना आपले जगणे मांडण्यासाठी असलेले व्यासपीठ म्हणजे अंकुर फिल्म फेस्टिव्हल असतो. यामध्ये फक्त फिल्म्सचे सादरीकरणच नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञांकडून शिकून आपली अभिव्यक्ति आणखी समृद्ध करण्यासाठीची संधी म्हणजे अंकुर फिल्म फेस्टिव्हल असतो. यात  कुठलीही स्पर्धा नाही, पारितोषिक नाही, अंतिम कलाकृतीपेक्षा कलाकृतीपर्यंत पोहचण्याच्या प्रयत्नांचे कौतुक करण्याच्या उद्देशाने अंकुर फिल्म  फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात येते. तरी नाशिककरांनी आवर्जून अंकुर फेस्टीव्हलमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन अभिव्यक्तीकडून करण्यात आले आहे.
अशी आहेत अंकुरची आकर्षणे……
उद्घाटन, माहितीपट स्क्रीनिंग आणि चर्चा :
दिनांक ९ डिसेंबर: शबानी हसनवालिया थर्ड आय, नवी दिल्ली.
माहितीपट : रात
वेळ: सायं. ६.३० ते ८:३० वाजता
कार्यशाळा :
दिनांक १० डिसेंबर, देबस्मिता  आणि अंशुमन एजेंट्स ऑफ इश्क, मुंबई.
विषय : लिंगभाव, संमती आणि लैंगिकता
वेळ स. १०:०० ते दु. १.०० वाजता
माहितीपट स्क्रीनिंग आणि चर्चा :
दिनांक १० डिसेंबर, बिशाखा दत्ता, पॉईंट ऑफ व्ह्यू, मुंबई,
फिल्म ताजा खबर हॉट ऑफ द प्रेस – डिजिटल स्टोरीज
वेळ सायं ६:३० ते ८.३० वाजता.
कार्यशाळा :
पौर्णिमा आगरकर,INECC पुणे,
विषय : हवामान बदल आणि कृतीशील प्रतिसाद
दिनांक ११ डिसेंबर २०२२
वेळ स. १०:०० ते दु. १.०० वाजता.
समारोप, माहितीपट स्क्रीनिंग आणि चर्चा :
दिनांक ११ डिसेंबर २०२२
हंसा थपलियाल, माहितीपट निर्मात्या, बेंगळूरू.
माहितीपट, द आउटसाइड इन
वेळ: सायं. ६.३० ते ८:३० वाजता
The 9th Ankur Film Festival, which aims to introduce Nashik, is being organized by Abhivyakti Media for Development. The festival will be held from 9th to 11th December 2022 at Kusumagraj Memorial, Vidyavikas Circle, Gangapur Road from 10 am to 6 pm every day. The festival is open to all and there is no entry fee. The festival will be formally inaugurated with the documentary Raat by renowned documentary maker Shabani Hasanwalia, Third Eye, New Delhi. The festival will conclude on December 9 with the presentation of the documentary film The Outside In by Hansa Thapliyal, a documentary maker from Bangalore. More than 50 films, documentaries, works of art will be presented in the festival and workshops will also be held on different topics.
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.