ylliX - Online Advertising Network

Ankur Film Festival अभिव्यक्तिचा ८ वा अंकुर फिल्म फेस्टिवल २०१९

यंदा स्वाती चक्रवर्ती भटकळ आणि फिल्म ‘कोरल वूमन’ मुख्य आकर्षणफिल्मच्या सादरीकरणासोबतच  कार्यशाळा आणि मान्यवरांशी संवादाची संधी (Ankur Film Festival)

यंदाही ८ वा अंकुर फिल्म फेस्टिवल २०१९ चे आयोजन करण्यात आले आहे. नेहमीप्रमाणे सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या फिल्मच्या सादरीकरणासोबतच फिल्म निर्मात्यांशी चर्चा आणि संबंधित विषयावर तज्ज्ञांच्या कार्यशाळांचे आयोजनही यावेळी करण्यात आले आहे. यानिमित्ताने नाशिककरांना अनेक मान्यवरांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.

सदरचा अंकुर फिल्म फेस्टिवल २०१९ हा दि. ६ ते ८ डिसेंबर या कालावधीत कुसुमाग्रज स्मारक, विद्याविकास सर्कल, गंगापूर रोड येथे रोज सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत संपन्न होणार आहे. विशेष म्हणजे हा  फेस्टिवल सर्वांसाठी खुला असून यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही.

अभिव्यक्ति मीडिया फॉर डेव्हलपमेंट, नाशिक यांच्याकडून नवोदित कलाकारांना, वंचित समुहातील घटकांना आपले जगणे मांडण्यासाठी अंकुर फिल्म फेस्टीव्हलच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. यंदाही  हाच उद्देश घेऊन ८ व्या अंकुर फिल्म फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.

या फेस्टिव्हलचे औपचारिक उद्घाटन प्रसिद्ध दिग्दर्शिका, लेखिका आणि ‘पानी फाऊंडेशन’ च्या सोशल मिडिया प्रमुख स्वाती चक्रवर्ती भटकळ यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. यावेळी त्यांची प्रसिद्ध फिल्म ‘रूबरू रोशनी’ दाखविली जाणार असून त्यानंतर त्या उपस्थितांशी संवाद साधणार आहेत.

फेस्टीव्हलच्या उद्घाटनाचा हा कार्यक्रम दि. ६डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता संपन्न होणार आहे. तर फेस्टिवलचा समारोप प्रसिद्ध दिग्दर्शिका प्रिया थुवाश्शेरी यांच्या गाजलेल्या ‘कोरल वूमन’ या फिल्मने होणार आहे. यावेळी त्या रसिकांशी संवाद साधणार असून हा कार्यक्रम संध्याकाळी साडे सहा वाजता संपन्न होणार आहे. फेस्टिवलमध्ये रोज सकाळी दहा वाजेपासून फिल्मचे सादरीकरण सुरु केले जाणार आहे. दिग्दर्शिका प्रिया थुवाश्शेरी फेस्टीव्हलच्या उद्घाटनाचा हा कार्यक्रम दि. ६डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता संपन्न होणार आहे. तर फेस्टिवलचा समारोप प्रसिद्ध दिग्दर्शिका प्रिया थुवाश्शेरी यांच्या गाजलेल्या ‘कोरल वूमन’ या फिल्मने होणार आहे. यावेळी त्या रसिकांशी संवाद साधणार असून हा कार्यक्रम संध्याकाळी साडे सहा वाजता संपन्न होणार आहे. फेस्टिवलमध्ये रोज सकाळी दहा वाजेपासून फिल्मचे सादरीकरण सुरु केले जाणार आहे.

यंदा पहील्यांदाच काही विदेशी फिल्मसही दाखविल्या जाणार आहेत. सोबतच फेस्टिवलमध्ये प्रत्येक दिवशी  फिल्म डिव्हिजन मुंबई यांच्या सहयोगाने तर आयोजक अभिव्यक्ति, नाशिक यांच्या सहकार्याने पुरस्कार विजेत्या फिल्म दाखवल्या जाणार आहेत. (Ankur Film Festival)

फेस्टिव्हलमधील आकर्षणे

कार्यशाळा : अॅड फिल्म मेकिंग

दिनांक : ७ डिसेंबर, वेळ १०.३० ते १.३० वाजेपर्यत

मार्गदर्शक :  सॅविन तुस्कानो

कार्यशाळा : ‘फिल्म संकलन’ अर्थात ‘एडीटींग’

दिनांक : ८ डिसेंबर, वेळ १०.३० ते १.३० वाजेपर्यत

मार्गदर्शक : प्रशांत नाईक, राष्ट्रीय पारितोषिक विजेते चित्रपट निर्माते. 

दिनांक : ७ डिसेंबर, वेळ ८  ते ९ वाजेपर्यत

डॉ. अरुण गद्रे यांच्या ‘एक एम आर की मौत’ कि या फिल्मचे सादरीकरण आणि चर्चा

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.