मौजे– अंबड खुर्द येथे हक्क चौकशी
नाशिक महानगर पालिका विस्तारीत क्षेत्रात समावेश झालेल्या मौजे- अंबड खुर्द गांवाचे हद्दीतील सर्व मिळकतींचे नगर भूमापन नकाशे तयार करण्यात आले असून भूमि अभिलेख विभागातर्फे हक्क चौकशीचे काम सुरू झाले आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे नियम 20(2) अंतर्गत माहे-ऑक्टोबर 2016 मध्ये मौजे- अंबड खुर्द येथील गट क्र. 81 ते 84, 104 ते 111, 116, 117 व 119 सर्वे नंबर 87, 89, 90, 92, 93 व एम.आय.डी.सी. मधील सर्व मिळकतीचे हक्क चौकशीचे काम करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने नकाशे अंतिम करुन मालमत्ता पत्रक तयार होणार आहे. कागदपत्राअभावी होणाऱ्या संभाव्य त्रुटी टाळण्याच्या दृष्टीने वरील गट नंबर मधील मिळकतधारक/भुखंडधारक यांनी त्याचे हक्क सिद्ध करणारे पुरावे तात्काळ विशेष उप अधिक्षक भूमि अभिलेख,तथा चौकशी अधिकारी,(श.मा.)क्र.1, नाशिक मनपा पश्चिम विभागीय कार्यालय इमारत (टेरेसवर), नविन पंडीत कॉलनी, शरणपुर रोड, नाशिक 2 यांचे कार्यालयात सादर करावे व आपला मिळकतीचा नकाशा व हक्काची नोंद अचूक झालेची खातरजमा करून घ्यावी, असे आवाहन विशेष उपअधिक्षक भूमि अभिलेख तथा चौकशी अधिकारी संजय तेजाळे यांनी केले. आहे.