ylliX - Online Advertising Network

शेतकरी मेला तरी यांना चालतंय… हीच सरकारची भूमिका : आ. बच्चू कडू

लासलगाव : शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसाठी कॉग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांनी काहीच केले नाही. त्यांनी शेतकर्‍यांची कान पकडून माफी मागावी. ते कसली संघर्ष यात्रा काढतात. त्यांचा कोणाचाही आवाज हा विधानसभेत पोहोचत नाही. फडणवीस कोणाचेही ऐकत नाहीत, त्यांचे कान उघण्यासाठी मंत्रालयात बॉम्ब फोडू, इट का जवाब बोम्ब से देंगे असा दम वजा इशारा इशारा देतानाच दोन्ही काँग्रेसची आमदार बच्चू कडू यांनी नालायकात गणना केली. भाजपावाले त्यांच्या वरचढ निघाले अशी घणाघाती टीका शेतकरी संघटनेचे नेते व आसुड यात्रेचे प्रणेते  आमदार बच्चू कडू यांनी केली. यावेळी त्यांनी विरोधीपक्ष नेते अजित पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील हे राज्यातील सर्वात गरीब शेतकरी असल्याची टीका कडू यांनी यावेळी केली.

गेल्या 11 एप्रिल पासून नागपूर येथून निघालेली आसुड यात्रा काल लासलगाव मध्ये पोहचली. मार्केटयार्ड मधील कृषी बाजारसमितीच्या हॉलमध्ये आज आसुड यात्रेची सभा पार पडली. यावेळी त्यांचे सोबत शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील  आदींसह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी  उपस्थित होते.

कडू म्हणाले, शरद पवार हे अनेक वर्षे सत्तेत होते. त्यांनी 60 वर्षात शेतकर्‍यांसाठी कोणताही एक चांगला निर्णय सांगवा, त्यांना स्वामीनाथन आयोगाची एक तरी ओळ त्यांनी लागू केली असती तर शेतकर्‍यांचे थोडे फार भले झाले असते. तसेच कांदा भाव वाढले की सगळेच बोंबलतात आणि आता कांद्याचा लागवडीचा खर्च ही निघत नसल्याने मोदी सरकार गप्प का? सरकार भूमिका ही शेतकरी मेला तरी चालेल पण नेता मात्र जगला पाहिजे अशी झालेली आहे. कर्मचारी निवृत्त झला की त्याला पेन्शन मिळते, गरोदर मातेला मदत मिळते मात्र शेतकरी म्हटला की यांच्या अंगाला का काटा येतो अशी टीका त्यांनी केली. रामदेव बाबा, टाटा, बिर्ला, अंबानी यांच्या मालाला निर्यात बंदी होत नाही मात्र शेतकऱ्यांच्या मालाला निर्बंध आणतात.

21 एप्रिल रोजी मोदींच्या गावी समारोप
नागपूर येथून 11 एपिल रोजी निघालेले ही यात्रा  पुढे नाशिक, धुळे, नंदुरबार, सूरत, अहमदाबाद, करत मोदींच्या गावी जाऊन तिथे समोराप होणार असून 3 लाख 50 हजार आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याना त्या ठिकाणी श्रध्दांजली वाहणार आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.