ylliX - Online Advertising Network

कुंभमेळा अलाहाबाद पोलिसांना नाशिक पोलिसांकडून नियोजनाचे प्रशिक्षण

नाशिक : नाशिक येथे कुंभमेळा अतिशय सुरक्षित आणि व्यवस्थित पार पडला होता, आता कुंभमेळा अलाहाबाद येथे होते आहे. याचे सुरक्षितता नियोजन कसे करावे यासाठी अलाहाबाद पोलिस नाशिक येथे आले आहेत. नाशिक पोलिसांकडून हे अधिकारी नियोजन कसे करावे याचे प्रशिक्षण घेत आहेत.

अलाहाबाद येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी कविंद्र प्रताप सिंह व पोलीस उपअधीक्षक प्रमोद शर्मा यांनी आज नाशिक पोलीस आयुक्तालयात आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी नाशिक कुंभमेळ्यात नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आलेल्या उपायोजनासाधू महतांना पुरवलेली सुरक्षापोलीस बंदोबस्तमार्गांचे नियोजन व भाविकांची सुरक्षा व्यवस्थागर्दी नियंत्रणयासाठीच्या पद्धती,अंतर्गत पार्किंगबाह्य पार्किंगदिशादर्शक फलकनो व्हेकल झोननो मॅन झोनत्यांचे टप्पेबॅरेकेडींगनिरिक्षण मनोरेटेहळणीसीसीटिव्ही मॉनेटरींगध्वनीक्षेपवायरेलस यंत्रणेचा वापरनियोजनप्रकाश व्यवस्थाअ‍ॅम्बुलन्स,आरोग्य यंत्रणेच्या जागाउपलब्धतास्नानासाठी जाणारा शाही मार्गभाविकांचा मार्गस्नानाच्या ठिकाणची सुरक्षा व्यवस्थाबंदोबस्तपरतीचे मार्गबुडणारांना वाचविण्यासाठीची यंत्रणाहरवलेले शोधण्यासाठीची यंत्रणासर्व प्रकारची पथकेसुरक्षा यंत्रणांचा वापरहजारो पोलिसांची राहण्याचीजेवणाची व्यवस्था यासह विविध बांबींची माहिती त्यांनी घेतली आहे. संबंधित अधिकार्‍यांना नाशिक येथे करण्यात आलेल्या नियोजनाचा आराखडा,छायाचित्रे तसेच प्रत्यक्ष व्हिडीओ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नदी पात्रात भाविकांचे सुरक्षा अशी असावी बंदिस्त जागेत काय सुरक्षा व्यवस्था करावी याची सुद्धा माहिती देण्यात आली आहे. तर साथीचे रोग पसरू नये म्हणून देखील माहिती दिली गेली आहे.यावेळी पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगरमाधुरी कांगणे कुंभमेळ्यात कार्यरत व मुख्य जबाबदारी असलेले अधिकारीकर्मचारी उपस्थित होते.

नाशिक पोलीस
आुयक्त सिंगल यांनी यापुर्वीच्या कुंभमेळ्याच्या नियोजन अनुभवावर लिहलेले कुशावर्ताचा कोतवाल हे पुस्तक अधिकार्‍यांना भेट म्हणून देण्यात आले.
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.