ylliX - Online Advertising Network

सर्वतीर्थ टाकेद येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शिबीर संपन्न

लासलगाव (वार्ताहर समीर पठाण) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, नाशिक रोड यांच्या विद्यमाने अनुभूती श्रमानुभव शिबिराचे आयोजन सर्वतीर्थ टाकेद येथे करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन लासलगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले. Akhil Bharatiya Vidyarthi Parishad ABVP camp sarvatirth taked Nashik Road

Akhil Bharatiya Vidyarthi Parishad ABVP camp sarvatirth taked Nashik Road, सर्वतीर्थ टाकेद येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शिबीर संपन्न Nashik On Web All India Student Conference is right wing all India student organisation affiliated to the Hindu nationalist Rashtriya Swayamsevak Sangh (RSS)

या प्रसंगी संध्याकाळच्या सत्रात ऐतिहासिक मशाल चा कार्यक्रम घेण्यात आला या मध्ये युवा संभाजी या विषयावर प्रा.पंकज नागमोती यांचे व्याख्यान झाले.

दुसऱ्या दिवसाच्या सत्राची सुरुवात श्रमदानाने झाली. संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. यानंतर सर्वांगिण व्यक्तिमत्व विकासाचे सत्र झाले याप्रसंगी डॉ. प्रशांत टोपे यांनी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. वादविवादाच्या सत्रात स्मार्टफोन हवा की नको या विषयावर अभाविप प्रदेश मंत्री अभिजीत पाटील यांनी चर्चा घडवून आणली. तसेच खजिना शोथ हा खेळ घेण्यात आला,त्याच प्रमाणे विविध सामाजिक विषयांवर पथनाट्य घेण्यात आली. Akhil Bharatiya Vidyarthi Parishad ABVP camp sarvatirth taked Nashik Road

या प्रसंगी नाशिक विभाग संघटनमंत्री सम्राट माळवदकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्याच प्रमाणे रात्री आकाश दर्शन कार्यक्रमासाठी सुजाता बाबर व सहकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अखेरच्या दिवसाची सुरुवात जंगल भ्रमन्तीचा आनंद लुटुन झाली.यानंतर बुद्धि कौशल्य- स्ट्रेटेजी वॉर हा खेळ घेण्यात आला.भोजनोत्तर संवाद कौशल्य सत्र अविनाश गोसावी यांनी घेतले.

संपूर्ण शिबिरामध्ये विविध तालुक्यातून एकूण ५५ विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. शिबिराची सांगता अनुभव कथन अभाविप मांडणी सम्राट माळवदकर व समारोप मिहीर महाजन यांनी केला. Akhil Bharatiya Vidyarthi Parishad ABVP camp sarvatirth taked Nashik Road

या शिबिरासाठी अभाविप प्रदेश मंत्री अभिजीत पाटील, नाशिक विभाग संघटन मंत्री सम्राट माळवदकर व नाशिक रोड विस्तारक मिहीर महाजन आदी उपस्थित होते.

Akhil Bharatiya Vidyarthi Parishad ABVP camp sarvatirth taked Nashik Road

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.