ylliX - Online Advertising Network

विमानतळाजवळ जागेचे आमिष, जवळपास आठशे गुंतवणूकदरांची फसवणूक

नाशिक : चीटफंड घोटाळे यामुळे नाशिक आर्थिक फसवणुकीसाठी बदनाम आहे. मात्र आता जमिनी विक्री फसवणूक गुन्हे समोर येत आहेत. त्यामुळे नाशिक आर्थिक फसवणुकीचे हब होतय असे चित्र समोर उभे राहिले आहे. आता कोपरगाव येथील काकडी काकडी विमानतळाजवळ प्लॉट देण्याचे आमिष दाखवून आगाऊ बुकिंग करत भामट्यांनी जळगावला प्रॉपर्टी मेळा भरवत जवळपास आठशे गुंतवणूकदरांची फसवणूक केल्याचे समोर आहे. सरकारवाडा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी पाच संशयितांन पैकी तिघांना अटक केली आहे. आठ तक्रारदारांची २३ लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, यामध्ये फिर्यादी सेवानिवृत्त बॅँक कर्मचारी सुरेश खंडेराव पाटील (६६यशवंत कॉलनी जळगाव)  यांनी सरकारवाड पोलिस स्टेशन येथे  नवीन नाशिक भागातील कामटवाडे , सिडको परिसरातील रहिवासी संशयित सुनील मारुती ढोली, जितेंद्र अशोक जगताप, योगेश सुभाष विश्वंभर, किरीट दगडू सद्गीर व दगडू पाटील या पाच व्यक्तींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

या सर्व पाच संशयितांनी जळगाव येथे २०१३ साली गुंतवणूक प्रॉपर्टी मेळावा घेतला होता. त्यात त्यांनी प्लॉटसाठी अनेक नागरिकांकडून आगाऊ नोंदणी करून घेतली होती . मग  त्यानंतर त्यांनी  कॅनडा कॉर्नर येथील पाटील प्लाझा या संकुलात मोरया कन्स्ट्रूवेल प्रा. लि. नावाने कार्यालय उघडले होते. तर नगर येथील कोपरगावातील काकडी शिवारात भविष्यात विमानतळ होणार आहे. त्यामुळे जागेला मोठा भाव येईल असे सांगून शासनाची जमीन दाखवून सदर जागेवर भूखंड पाडले जाणार आहेत असे सांगत सर्व गुंतवणुकदारांना  जातील, असे सांगून स्वस्त रकमेचे आमिष दाखविले होते. मग पुढील काम म्हणून त्यांनी प्रत्येकाकडून ५०० ते १००० रुपये नोंदणीच्या नावाखाली पैसे गोळा केले होते. मात्र प्राथमिक स्थितीत  सध्या आठ तक्रारदार पोलिसांपर्यंत दाद मागत आहेत. यामध्ये या सर्वांची मिळून अशी एकूण २३ लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक जझाली अशी तक्रार दाखल केली आहे.  झाल्याचे पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

या संशयित फसवणूक करणाऱ्या टोळीने अधिक बनावट कंपनी तयार करत खासगी बॅँकेत खाते उघडले होते. तर प्लॉटधारक म्हणून नोंदणी केलेल्या नागरिकांकडून वेळोवेळी अनेकदा जाव्लापास लाख ते पाच लाखांपर्यंत पैसे घेतले होते. जवळपास ८०० गुंतवणूक दार नोंदवले आहेत.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.