ylliX - Online Advertising Network

पुण्याची विमानसेवा बंद तर मुंबईसाठी सेवा अनिश्चित

नाशिकप्रत्येक वेळी नवीन तारीख सांगत विमान सेवा न देता ती टाळण्याच काम सध्या सुरु असून, आता  एअर डेक्कनकडून हवाईसेवेचे नवीन शेड्युल जाहीर करण्यात आले असले तरी, प्रत्यक्षात मुंबई वगळता पुण्याची सेवा परस्पर बंद केली आहे.तर फक्त मुंबईच्या सेवेबाबतही मोठी  अनियमितता ठेवत फक्त केंद्र सरकारच्या “उडान’ योजनेंतर्गत सरकारी अनुदान लाटण्याचा प्रयत्न विमानसेवा कंपन्यांकडून होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता नाशिकमधून फक्त मुंबई साठी विमान असेल तेही कंपनीला वाटेल तेव्हा ते उडणार असून इतर ठिकाणी सेवा पूर्व सूचना न देता बंद करण्यात आली आहे. Air Services Mumbai uncertain Pune Airplane service closed

डिसेंबर 2017 पासून  तळ्यात मळ्यात करत एअर डेक्कनतर्फे उडान योजनेंतर्गत नाशिक – मुंबई व नाशिक – पुणे विमानसेवा सुरू केली होता. सुरवातील वेळेवर सुरु असलेल्या विमानसेवेसाठी नाशिककरांनी 19 सीटरच्या सेवेला चांगला प्रतिसाद दिला होता.नाशिक- पुणे सेवा सुरळीत होती त्यासाठी ग्राहक सुद्धा मिळत होते. मात्र नंतर   पण मुंबई विमानतळावर स्लॉट उपलब्ध होत नसल्याने वेळ अनियमित झाली. प्रारंभी सकाळी नाशिकहून मुंबईसाठी विमानाचे उड्डाण होते. त्यानंतर दुपारी बाराला वेळ निश्‍चित झाली. काही दिवसांनंतर पुन्हा वेळापत्रक विस्कळित झाले.

15 एप्रिल २०१८ पासून सेवा पूर्ववत करताना वेळेचे नवीन शेड्युल जाहीर झाले. त्यात सकाळी सहाला मुंबईसाठी विमानाचे उड्डाण होईल, तर पुण्याची वेळ कायम ठेवण्यात आली होती; परंतु मुंबईच्या वेळेत अजूनही अनियमितता असून, पुण्याची सेवा कंपनीकडून कुठलीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आली. या आगोदर अनेकदा विमान सुरु होणार असे दाखवत बुकिंग सुद्धा घेतल्या गेल्या होत्या, मात्र कोणतेही कारणे देत कंपनीने विमान उडवले नाही. त्यामुळे आता पुणे येथे विमान उडणार नसून, मुंबई साठी सेवा अनिश्चित आहे.

Advertise With us, Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi,Your Name, City  or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! NashikOnWeb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.