एअर डेक्कन नाशिक-पुणे विमानसेवा सुरू करणार
नाशिक : प्रतिनिधी
उडान योजनेंतर्गत येत्या सप्टेंबर अखेरीस नाशिक-मुंबई आणि नाशिक-पुणे विमानसेवा एअर डेक्कन सुरू करणार आहे. दिल्लीमध्ये झालेल्या विंग 2017 ‘सब उडो, सब जुडो’ या चर्चासत्रादरम्यान एअर डेक्कन कंपनीने आश्वासन दिल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.
प्रादेशिक कनेक्टिव्हिटीअंतर्गत महाराष्ट्र राज्याच्या पुढाकारामध्ये 23 ऑगस्ट 2016 रोजी एनसीएपीमध्ये आरसीएसअंतर्गत केंद्र सरकार, एएआय आणि जीओएम यांच्यात झालेल्या सामंजस्य करारमध्ये (एमओयू) शिर्डी, अमरावती, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, नांदेड, गोंदिया, सिंधुदुर्ग, जळगाव आणि रत्नागिरी ही विमानतळे आरसीएसअंतर्गत असणार आहेत.
दुसर्या सत्रात प्रत्येक राज्यातील सिव्हिल एव्हिएशन अधिकार्यांसमवेत सिव्हिल एव्हिएशनच्या प्रधान सचिव वत्सला नायर, यू. पी. ककाणे, खासदार हेमंत गोडसे व एअर इंडियाच्या सर्व अधिकार्यांशी महाराष्ट्रात व नाशिकमधील विमानसेवा सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. साधरणत: या सवेेचे 1500 ते 1800 दरम्यान भाडे असेल व सप्टेंबरअखेर विमानसेवा सुरू करू असे आश्वासन कंपनीने दिल्याचे खा. गोडसे यांनी सांगितले. उडाण योेजनेंतर्गत विमानसेवेसाठी मिळालेल्या एअर डेक्कनच्या अधिकार्यांशी चर्चा करण्यात आली. त्यामध्ये डीजीसीएकडे परवानगी व मुंबईला टाइमस्लॉट मिळण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे खा. गोडसे यांनी स्पष्ट केले.