ylliX - Online Advertising Network

संतापजनक :  एड्स रोग लपवून मुलासोबत लावले मुलीचे लग्न, आयुष्य उध्वस्त  !

नाशिक –मोठा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या दुर्दैवी प्रकारात मुलाच्या घरच्यांनी  मुलाला एचआयव्ही एड्स हा आजार असतानाही तो लपवत, कोपरगाव तालुक्यातील एका २४ वर्षीय तरुणीशी त्याचा विवाह लावून दिला. त्यामुळे तिची काहीच चूक नसतांना तिलाही आहा रोग झाला आणि तिचे आयुष्य उध्वस्त झाले. सासरच्या दोषी चौघांविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात फसवणुकीसह शारीरिक व मानसिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती एसीपी राजू भुजबळ यांनी दिली आहे.

दुर्दैवी प्रकारातील विवाहिता २४ वर्षीय आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ती अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव भागातील रहिवासी आहे. तिचा विवाह गेल्या अडीच वर्षांपूर्वी नाशिक शहरातील जुना मुंबई नाका येथे राहणार्‍या एका कुटुंबात झालेला होता. २४ वर्षीय विवाहिता ही आपल्या नाशिक येथील सासरी नांदत असताना तिच्या सासरच्या चौघा संशयितांनी (यातील दोन महिला संशयित) २४ वर्षीय विवाहितेला “तुझ्यामुळे आमच्या मुलाला एचआयव्ही एड्स आजार झाला आहे,” असे म्हणून अपमानित करून हीन वागणूक दिलली होती. त्याबरोबर  तसेच दि. २ जून २०१५ पासून दि. ५ जानेवारी २०१८ या कालवधीत  पीडितेचा सासरी शारीरिक व मानसिक छळ केला होता.

विवाहितेच्या पतीस पूर्वीपासूनच एचआयव्हीची लागण आहे, हे माहीत असतानादेखील घटनेतील चारही संशयितांनी त्याचे लग्न तिच्याशी लावून दिले आहे. त्यामुळे तिचा विश्‍वासघात करून फसवणूक केली. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार चौघा संशयितांविरुद्ध फसवणूक, दमदाटी, मारहाण, शारीरिक व मानसिक छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यांच्या एका चुकीमुळे या मुलीला हे दुर्दैवी दिवस बघावे लागले आहेत. त्यामुळे विवाह आगोदर एड्स आणि इतर रक्त चाचण्या नक्की करा. जिल्हा रुग्णालयात अगदी कमी दरात आय चाचण्या केल्या जातात.

( यातील नावे कायद्यातील तरतुदीनुसार  प्रसिद्ध करता येणार नाहीत.) 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.