गोदावरी एक्सप्रेस गणेश मंडळाच्या वतीने भंडाऱ्यांचे आयोजन….

गोदावरी एक्सप्रेस गणेश मंडळाच्या वतीने भंडाऱ्यांचे आयोजन….

 नाशिक : मनमाड ते लोकमान्य टिळक टर्मिनल धावणारी चाकरमन्यांची गोदावरी एक्सप्रेस या गाडीत गेल्या २० वर्षापासून गणेश उत्सव साजरा करण्यात येतो.
दिनांक ९ , शुक्रवार रोजी गोदावरी एक्सप्रेस गणेश मंडळा च्यावतीने भंडाऱ्यांचे आयोजन केले होते. सदर प्रसंगी गोदावरी एक्सप्रेस या  गाडीतील सर्वांनी भंडाऱ्याचा लाभ घेतला या वेळी ढोल ताशाच्या गजरात नाचत नाचत सर्व युवक , महिला आणि रोज ये-जा करणाऱ्या विविध क्षेत्रातील , सरकारी  अधिकारी , कर्मचारी, व्यसायिक आदि मिळून तयार झालेले हे मंडळ आहे..
एक कुटुंब गणेश उत्सव किंवा सार्वजनीक गणेश उत्सव मंडळा पेक्षा वेगळा अनुभव या प्रसंगी येतो, रोजचा प्रवास त्या प्रवासात भेटलेले प्रवासी यांनी तयार केलेले मंडळ आणि तेही तब्बल २० वर्ष खरच या गणेश उत्सवाला मनापासून कौतुक करावे तितके थोडे,
गोदावरी एक्सप्रेस गणेश मंडळाचे  सुदाम गायकवाड,  सुनील देसाई, सचिन गिरासे, सतिश साबळे, शंकर दोंदे, बाबा निकाळे, कैलास बर्वे, संतोष गायकवाड, अनिल पाटिल, अशोक परदेशी,  सचिन जाधव,  श्रीमती सुशीला माने, संतोष जुन्नरकर,  रवि गांगुर्डे, रफीक शेख,  ज्ञानेश्वर चंद्रे, नारायण चकोर , प्रवीण जाधव, मकरंद जोशी, आशिष तिवारी आदिनी उत्सव व भंडारा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली, १० दिवस गणपती पूजन रोज २ वेळस आरती होते अनेक मान्यवर , राजकीय पुढारी यावेळी आरतीस येतात

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.