सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी आतंकवादी कसाबला शिवी दिली होती. हो, हे खर आहे. हा संपूर्ण किस्सा त्यांनी स्वतः सांगितला आहे. अॅड. उज्ज्वल निकम हे नाशिकला खान्देश मोहत्सवासाठी आले होते. तेव्हा त्यांनी त्यांची ही आठवण सांगितली आहे. जेव्हा कसाब विरोधात केस सुरु होती तेव्हा अनेकदा संयमी अॅड. उज्ज्वल निकम यांचा संताप होत असे मात्र न्यायालयाची गरिमा पाहता ते आपला राग आवरत असत.
जेव्हा कसाब विरोधात केस सुरु होती तेव्हा अनेकदा संयमी अॅड. उज्ज्वल निकम निकम यांचा संताप होत असे तसा एकदा संताप झाला. त्याला संतापात ते वेगळी शिवी घालाणार होते मात्र त्यांनी त्याला “बट्टाड” अशी अहिराणी भाषेतून दिली होती (ब पासून अनेक शिव्या आहेत.) न्यायलयाने लेगेच निकम यांना विचारले की तुम्ही काय म्हणाला तेव्हा निकम म्हणाले की हा फ्रेच शब्द आहे. तो मी उच्चारला आहे. तेव्हा न्यायालय काही म्हटले नाही.
जेव्हा निकम हे सुपरस्टार रजनीकांत याला भेटले होते. तेव्हा त्याच्या सोबत त्यांनी मराठीतून संवाद साधाल होता. तेव्हा रजनीकांत सुद्धा त्यांच्यासोबत मराठीत बोलला होता. त्यामुळे त्याला त्याच्या मातृभाषेचा कसा अभिमान आहे हे सुद्धा निकम यांनी सांगितले आहे.
अॅड. निकम यांच्या हस्ते ‘खान्देश रत्न 2017’ पुरस्काराचे वितरण झाले. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून बोलताना अॅड. निकम यांनी ही आठवण सांगितली आहे. व्यासपीठावर आमदार सीमा हिरे, जि. प. अध्यक्षा शीतल सांगळे, मविप्र अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, एमटीडीसीचे आशुतोष राठोड, रमेश गायधनी, रश्मी हिरे आदी उपस्थित होते.