महात्मानगर : कारची झाडाला धडक एक ठार

नाशिक : महात्मानगर परिसारत मध्यरात्री झालेल्या अपघतात एकाचा मृत्यू झाला आहे. यात वेगात असलेली कार झाडाला आदळली होती. या धडकेत कारचालकाचा मृत्यू झाला आहे. महात्मानगर रोडवरील आयडीआय शोरूमसमोर घडली़ आहे. यामध्ये  रंजीत भालचंद्र पाटील (५२, रा. भालचंद्र कॉलनी, फ्लॅट नंबर २३, कॅनडा कॉर्नर, नाशिक) यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास हा पघात घडला आहे. यातील मयत  रंजीत पाटील कारने (एमएच १८, व्ही १०३८) एबीबी सर्कलकडून जेहान सर्कलकडे वेगात येत होते. महात्मानगर रोड ने जात असताना त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आयडीया शोरूमसमोर रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळले़ होते. त्यात त्यांना छाती,  खुब्यास गंभीर मार लागला होता त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला़ आहे.पोलीस नाईक भिकाजी झनकर यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.