ylliX - Online Advertising Network

गतिरोधकावर आदळून दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू

नाशिक : नाशिक शहरात अपघातांची मालिका सुरूच असून नवीन नाशिकमधील उत्तम नगर, सिडको येथे ट्रकच्या धडकून गतीविरोधकावर आपटून एका दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला आहे. शोभा जयप्रकाश भांबरे (वय ६० रा. पवननगर) असे या महिलेचे नाव आहे. एमएच ०४ सीजी ३०६६  या ट्रकची धडक दुचाकीला होऊन हा अपघात झाला. महिलेचा जागीच मृत्यु झाला.

गेल्या वर्षी लेखा नगर येथे ट्रकच्या धडकेने मृत्यू झाल्याच्या घटनेचीच ही पुनरावृत्ती दिसून येत असून गतिरोधकावर आदळून हा अपघात झाला आहे. या महिलेने हेल्मेट घातले नसल्याचे समजत असून हेल्मेट घातलेले असते तर कदाचित चित्र वेगळे असते अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

PC : Ganesh Joshi Citizen Of Nashik.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.