इगतपुरी येथे मुंबई आग्रा महामार्गावरील नवीन झालेल्या कसारा घाटात ब्रेक फेल झालेल्या कंटेनरला मागून वेगात येत असलेल्या मालवाहू ट्रकने जबर धडक दिल्याने, झालेल्या अपघातात कंटेनरमधील ड्रायव्हर, क्लिनर ठार झाले आहेत. इगतपुरी जवळील मुंबई आग्रा महामार्गावरील नवीन कसारा घाटात नाशिकहुन मुंबईकडे उताराच्या दिशेने माल वाहु कंटेनरचा ब्रेक फेल झाला होता, कंटेनर एम. एच. ४६ बी. एफ. ३१४६ उतार असल्याने धीम्या गतीने खाली येत होता. मात्र मागून वेगात येणाऱ्या ट्रकने एम. एच. १९ झेड. ६०६७ या घाट उतरत असलेल्या कंटेनरला जबर धडक दिली, या मध्ये कंटेनरमधील ड्रायव्हर , क्लिनर खाली पडुन त्यांच्या अंगावरून कंटेनर गेल्याने ते जागीच ठार झाले आहे. या अपघाताची माहिती समजताच मुंबई नाशिक एक्सप्रेस रूटचे पेट्रोलिंग आॅफिसर महामार्ग सुरक्षा पोलीस यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन रु ग्णवाहिका प्राचारण करु न मृतांना इगतपुरी ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले. अपघाताबाबत कसारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र मृतांची नावे समजू शकली नाहीत.