www.nashikonweb.com
नाशिकचे स्वत:चे विश्वसनीय वार्ता देणारे डिजिटल न्यूज पोर्टल
————————————————————————————————————————————–
नमस्कार नाशिककर,
www.nashikonweb.com तर्फे आपले डिजिटल जगात स्वागत आहे.आज आपल्याला आवर्जून महिती देण्याचे प्रयोजन असे की , आता सोशल मिडीया आणि हातातील मोबाईल यामुळे इंटरनेटच्या सहाय्याने माहिती सहज आदान-प्रदान तर होतेच मात्र ती काही शून्य वेळेत इतर ठिकाणी पोहचवता येते. यामुळे आजच्या डिजिटल जगात कोणतीही माहिती लपवून ठेवता येणे शक्य नाही. त्यामुळे माहिती किती खरी येते आणि तिचा तपशील किती बरोबर आहे? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. पत्रकारीतेत असल्याने गेले ८ वर्षे आम्ही बातमी अर्थात वार्ता देताना प्रत्येक गोष्ट तपासून,तिचा समाज जीवनावर होणारा परिणाम आणि इतर गोष्टी आम्ही तपासतो आणि प्रसिद्ध करतो. मात्र आता जसे माध्यम बदलत आहेत तशीच तिची अर्थात महिती किती विश्वसनीय आहे हे तपासणे गरजेचे होते, अर्थात कोणी ती पुरवली याकडेही लक्ष देणे गरजेचे ठरते. यामध्ये आम्ही आमची टीम अश्या प्रकारे बनविली आहे की सर्व पत्रकार आणि इतर सहकारी माध्यम क्षेत्रात कार्यरत असून आम्ही मुख्य प्रवाहातील पत्रकारिता करतो. तर आमचे सहकारी अनेक वर्षापासून अनेक नामंकित वृत्तपत्रे,२४ तास वृत्त वाहिनी या ठिकाणी काम केलेले आहोत. विशेष म्हणजे आम्ही पत्रकारितेतील पूर्ण वेळ शिक्षण घेतले आहे. त्यामुळे महिती देताना आम्ही विवेक बुद्धीचा उपयोग करतो.
नाशिक मधील घडत असलेल्या घटना,महिती आणि योग्य वस्तुस्थिती मांडण्याकरीता आम्ही www.nashikonweb.com हे डिजिटल वेब पोर्टल सुरु केले आहे. यामध्ये नाशिक,उत्तर महाराष्ट्र,राज्य तसेच इतर बातम्या महितीचा समावेश केला आहे. तर आजच्या दिवशी घडणारी घटना लगेच आणि विश्वसनीयतेने बघता यावी याची पूर्ण काळजी आम्ही घेतली आहे. तरी आमच्या डिजिटल न्यूज वेब पोर्टल वर आपली माहिती,प्रेस नोट,प्रसिद्धी पत्रक, कार्यक्रम,आपल्या आजूबाजूला घडणारी घटना,सत्कार,सभारंभ,सांस्कृतिक कार्यक्रम,खेळ,कृषी,व्यक्ति विशेष,संस्था त्यांची माहिती, चांगले कार्य,समाज सेवक कार्य,आपल्या परिसरातील समस्या आणि इतर सर्व जे आपल्याला आम्हाला न्यूज पोर्टल म्हणून सांगावे वाटेल ते सर्व आपण आम्हाला कळवू शकता.या सर्व गोष्टींची दखल तर घेवूच तर माहिती लाखो वाचकापर्यंत पोहचवू तसेच प्रशासन,शासन यांना दखल घेणे भाग पाडू हा विश्वास आम्ही देतो.
प्रसिद्धी पत्रक,निमंत्रण आणि इतर महिती तसेच जहिरात माहिती करिता आपण इमेलच करावा असा आमचा आग्रह आहे.
आम्ही आपल्या करिता सर्व स्तरावर उपलब्ध आहोत. आपण वेबसाईटला व्हिजीट करत तेव्हा तुम्ही तुमची प्रतिक्रिया तेथे थेट नोंदवू शकता, तर इतर महिती पुढील प्रमाणे आहे.
www.nashikonweb.com on Social media please Follow and Like page
E-mail id :- nashikonweb.news@gmail.com
Twitter :- https://twitter.com/
Facebook :- https://www.facebook.com/
(सर्व अधिकार @Positive Media Relation’s आणि वेबपोर्टलचे नाव कायदेशीर सुरक्षित आहेत.भारत सरकारच्या सायबर क्राईम कायदा आणि भारतीय आंतरराष्ट्रीय वेबसाईट कायद्या अंतर्गत नावं आणि इतर गोष्टी नोंद केल्या असून , सर्व कायदेशीर प्रयोजन नाशिक जिल्हा आणि मुंबई उच्च न्यायालयीन विचारधीन आहे. तर जागतिक कंपनी वर्डप्रेस सोबत आम्ही सलग्न आहोत )
NashikOnWeb.com is a new age initiative of Positive Media Production which has a formidable track record in the domain of Media and Entertainment. NashikOnWeb.com is made for providing unbiased news, views and clean entertainment. We deliver News content from Nashik, North Maharashtra.