तेलगी स्टॅम्पपेपर घोटाळा, तेलगीसह ७ जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

नाशिक : कोट्यवधी रुपयांच्या स्टॅम्प चोरी प्रकरणातील रेल्वे सुरक्षा बलाच्या तत्कालीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने सोमवारी सदरचा निकाल दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या प्रकरणाची नियमित सुनावणी जिल्हा न्यायाधीश पी. आर. देशमुख यांच्याकडे सुरू होती. दरम्यान या खटल्यातील प्रमुख आरोपी अब्दुल करीम लाडसाब तेलगी याचे २३ आॅक्टोबर २०१७ रोजी तुरुंगात मृत्यू झाला आहे. या प्रकरणात  सरकार पक्षाची बाजू सीबीआयचे वकील एके मिश्रा यांनी तर आरोपीकडून अ‍ॅडएसबी घुमरे अ‍ॅड.ढिकले व एमवायकाळे यांनी काम पाहिले.
नाशिकरोडच्या भारत प्रतिभुती मुद्रणालयात छापले जात असलेले स्टॅम्पपेपर रेल्वे वॅगनद्वारे देशभरात पाठविले जातात. मात्र रस्त्यातच रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी व कर्मचारी रेल्वे बोगीचे सील तोडून स्टॅम्पची चोरी करून ते अब्दुल करीम तेलगी यास विक्री करीत असल्याची माहिती केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग दिल्ली (सीबीआय) यांच्या आर्थिक गुन्हे शाखेस मिळाली होती.  त्यानुसार १६ डिसेंबर २००३ मध्ये गुन्हा दाखल करून नाशिकच्या विशेष सीबीआय न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. नाशिकच्या विशेष न्यायालयात  सीबीआयने २००५ मध्ये हजारो पानी दोषारोपपत्र दाखल केले. तर फेब्रुवारी २०१६ पासून या खटल्यात पुरावे नोंदविण्यास सुरूवात झाली.

Abdul Telagi
Abdul Kareem Telgi

यामध्ये सीबीआयचे वकील व आरोपीच्या वकीलांनी ४९ साक्षीदार तपासले. सीबीआयने न्यायालयात दाखल केलेले कागदपत्रे साक्षीदारांची साक्ष हे आरोपींवरील आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे नसल्याने सातही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. स्टॅम्प चोरीबाबत कोणत्याही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नसल्याचे आणि पंचनामा झाला नसल्याचे आरोपींचे वकीलानी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.याप्रकरणात रामभाऊ पुंजाजी पवार (रेल्वे सुरक्षा बलाचे भुसावळ विभागीय अधिकारी) ब्रिजकिशोर तिवारी (निरीक्षक रेल्वे सुरक्षा बल) विलासचंद्र राजाराम जोशी (निरीक्षक रेल्वे सुरक्षा बल)प्रमोद श्रीराम डहाके (उपनिरीक्षक रेल्वे सुरक्षा बल) मोहम्मद सरवर (शिपाई रेल्वे सुरक्षा बल)विलास जनार्दन मोरे (शिपाई रेल्वे सुरक्षा बल) ज्ञानदेव रामू वारके (हवालदार रेल्वे सुरक्षा बल) या आरोपीची निर्दोष मुक्तता झाली आहे.

तेलगीला एड्स झाल्यामुळे त्याला न्यायालयीन सुनावणीत गैरहजर राहण्याची अनुमती मिळावी यासाठी त्याच्यावतीने खुप प्रयत्न करण्यात आले. परंतु पारख यांनी चिकाटीने सीबीआयच्या मागे लागून कधी हैद्राबाद तर कधी बेंगलोर न्यायालयात पाठपुरावा करून अखेर २०१३ मध्ये अब्दुल करीम तेलगी याच्या नावाने वॉरंट घेतले अखेर पोलीस बंदोबस्तात तेलगी नाशिकच्या न्यायालयात हजर झाला. गेल्या वर्षी आॅक्टोंबर महिन्यात त्याचे तुरूंगातच निधन झाले होते. त्याच्या अनुपस्थितीत या खटल्याचे कामकाज चालले, त्यात तो मृत्युपश्चात निर्दोष साबीत झाला.

अब्दुल करीम तेलगी आणि त्याच्या भावांनी नाशिकच्या प्रींटिंग प्रेसमधून जुनी मशिनरी आणून बनावट मुद्रांक छापले होते. हे बनावट स्टॅम्प देशभरात विक्री करुन त्याने कोट्यवधी रुपये जमवल्याचा आरोप आहे. आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

20 हजार कोटींच्या बनावट मुद्रांक घोटाळ्यात तेलगीला 2007 मध्ये दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यावेळी त्याला 30 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. इतकंच नाही तर त्याच्यावर 202 कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. तेलगीला 2001 मध्ये अजमेर इथून अटक करण्यात आलं होतं. तेव्हापासून तेलगी गेल्या वर्षीपर्यंत जेलमध्येच होता. गेल्या वर्षी त्याचा बंगळुरुतील सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला.

Like Our Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb/

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.