ylliX - Online Advertising Network

विरोधी पक्ष नेते विखेंच्या शाळेवर आयुक्त मुंढे यांचा हातोडा, नवीन वादाला सुरुवात

नाशिक : आपल्या कार्यकुशलता आणि शिस्तीने लोकप्रिय असलेले मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता थेट विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखेपाटील यांच्याशी पंगा घेतला आहे. विषय सुद्धा गंभीर आहे. नाशिक महापालिका हद्दीतील अंबड लिंक रोडवरील डॉ. विखे पाटील फाउंडेशनच्या शाळेच्या अनधिकृत बांधकाम नियमितीकरणाचा प्रस्ताव पालिका आयुक्त यांनी नामंजूर केला आहे. तर सोबतच शाळेसाठी महापालिकेने दिलेला मोकळा भूखंड ताब्यात घेण्यासाठीही नोटीस पाठवली आहे. राज्यातील विधानसभा विरोधी पक्ष नेत्यांच्या शाळेचे अतिक्रमण काढून घेण्याची नोटीस दिली त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडाली आहे. आता मुंढे यांच्या कार्यप्रणाली पाहता  डॉ. विखे पाटील फाउंडेशनच्या अंबड लिंक रोडवरील शाळेतल्या एका इमारतीवर हातोडा पडणार हे जवळपास निश्चित आहे.Aayukt tukaram mundhe take action against opposition leader congress vikhe patil nashik

आयुक्तांनी येताच सत्तधारी भाजपा सोबत पंगा घेतला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मुंढे यांना नाशिकला पाठवले असल्याने लोकप्रतिनिधी विरोध आणि नागरिकांचा प्रचंड पाठींबा मिळाला यामुळे मुढे यांच्यावर बदलीची कारवाई झाली नाही. मात्र लोकप्रतिनिधी मुंढे वाद सुरु होता.Aayukt tukaram mundhe take action against opposition leader congress vikhe patil nashik

विखे फाउंडेशन या शाळेत नर्सरी ते दहावीपर्यंत शिक्षण होते. इमारतीला  पहिला दाखला २००२ तर दुसरा दाखला २०१२ मध्ये नगररचना विभागाने दिला आहे. तिसऱ्या इमारतीसाठी कम्पाउंडिंग पॉलिसीअंतर्गत अर्ज दाखल करण्यात आला आहे. मात्र पॉलिसीची मुदत असताना आणि छाननी अपूर्ण असतानाच आयुक्तांनी आपल्या अधिकारात हा विषय नामंजूर केल्यामुळे विश्वस्तांपासून तर मुख्याध्यापकापर्यंत सर्वाना धक्का बसला आहे. शाळा व्यवस्थापनाने  भाजप पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. मात्र सत्तधारी किती बळ देतील हा प्रश्नच आहेAayukt tukaram mundhe take action against opposition leader congress vikhe patil nashik

उदाहरण म्हणून शाळेचा फोटो

सतत गैरहजर आयुक्त करणार चौकशी

मनपा प्रशासनाने 160 सफाई कर्मचार्‍यांवर कारवाई केल्यानंतर आता सतत गैरहजर राहणार्‍या 18 कर्मचार्‍यांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्याचे आदेश मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. त्यानुसार आरोग्य विभागाकडून अहवाल मागविण्यात आला असून, अहवाल आल्यानंतर संबंधित कर्मचार्‍यांवर दोषारोप ठेवून चौकशी केली जाणार आहे. तीन ते सहा महिने असे सतत गैरहजर राहणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या 18 इतकी असून, प्रशासन विभागाकडून आता संबंधितांवर दोषारोप निश्‍चित करून त्यांची चौकशी होणार आहे. याबाबत प्रशासन विभागाने आरोग्य विभागाकडून माहिती मागविली आहे.

Aayukt tukaram mundhe take action against opposition leader congress vikhe patil nashik
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.