राममंदिर उभारणीसाठीची नाशिक मध्ये संत सभा 

नाशिक- अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी नाशिक जिल्हा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे शनिवार दि. 8 डिसेंबर रोजी भद्रकालीतील साक्षी गणेश मंदिर परिसरात सायंकाळी 5.45 वाजता आयोजित भव्य संत सभा मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाचे आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.aayodhya raam mandir issue bjp organised sant sabha nashik news 

            संत सभेच्या नियोजनासाठी संघ परिवारातर्फे वसंतस्मृती कार्यालयात भारतीय जनता पक्षाचे आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. राम हा सर्वांच्या श्रद्धेचा विषय असून राममंदिर व्हावे ही सर्वांची ईच्छा असल्याचे विहिंपचे जिल्हा मंत्री गणेश सपकाळ आणि रा. स्व. संघाचे विभागीय कार्यवाह संजय कुलकर्णी यांनी सांगितले. त्याच्या जनजागृतीसाठीच संत सभा असून ती यशस्वी करावी, असे आवाहन त्यांनी करताच संत सभा विराट होईल, असा विश्वास उपस्थित सर्वानी व्यक्त केला. संत सभेत विहिंपचे अ.भा.संघटन मंत्री विनायकराव देशपांडे, ह.भ.प. माधव महाराज घुले आदी आपले विचार मांडणार आहेत.aayodhya raam mandir issue bjp organised sant sabha nashik news 

          भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, महानगर अध्यक्ष आ.बाळासाहेब सानप, आ.देवयानी फरांदे आदिनीही यावेळी मार्गदर्शन करून सभेसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. दुर्गा वहिनीच्या सहसंयोजिका मीनल भोसले यांचेही भाषण झाले. व्यासपीठावर प्रदेश प्रवक्ते प्रा. सुहास फरांदे, सभागृह नेते दिनकर पाटील, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगूरकर, महिला आघाडीच्या महानगर अध्यक्ष रोहिणी नायडू आदी होते. बैठकीस नगरसेवक आणि विविध आघाड्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पवन भगुरकर यांनी सूत्रसंचलन केले.

(भाजपा पक्षाचे अधिकृत प्रसिद्धी पत्रक)

aayodhya raam mandir issue bjp organised sant sabha nashik news 
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.