ylliX - Online Advertising Network

आपलं पर्यावरण : अशी साजरी झाली एक अनोखी वटपौर्णिमा

वट वृक्षाची लागवड करून आपलं पर्यावरण आणि वनविभाग नाशिक यांनी साजरी केली वटपौर्णिमा

वटपौर्णिमा म्हटलं की वटवृक्षाचे महत्व आपणास लक्षात येते. दिवसेंदिवस वट वृक्षाची कमी होत जाणारी पर्यावरणाच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. हे लक्षात घेता आणि वट पौर्णिमेचे औचित्य साधून आपलं पर्यावरण संस्था आणि वनविभाग नाशिक यांच्या वतीने वटवृक्षाची लागवड करण्यात आली. म्हसरूळ येथील वन कक्ष क्रमांक १९३ येथे महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते वटवृक्षाची लागवड करण्यात आली. Aapla paryavaran celebrated vatapaurnima planting banyan tree nashik mayor vanarai

म्हसरूळ येथील वनकक्ष क्रमांक १९३ येथे ५ जून २०१५ व २०१६ पर्यावरण दिनी लागवड केलेल्या वृक्षांची पाहणी महापौर रंजना भानसी यांनी केली. याठिकाणी निर्माण होणाऱ्या “नाशिक वनराई” च्या कामाचे महापौर यांनी कौतुक केले. ३५ प्रकारची विविध विविध दुर्मिळ झाडांची त्यांनी आस्थेवाईकपणे माहिती घेतली. Aapla paryavaran celebrated vatapaurnima planting banyan tree nashik mayor vanarai

आपलं पर्यावरणचे शेखर गायकवाड यांनी त्यांना सर्व नाशिक वनराईची माहिती दिली. याप्रसंगी वनविभागाच्या डी.सी.एफ. टी ब्यूला, ए सी एफ स्वप्नील घुरे, ए सी एफ कांचन पवार, आर एफ ओ प्रशांत खैरनार आदी उपस्थित होते.

“नाशिकच्या पर्यावरण समतोल साधण्यासाठी वृक्षलागवड आणि संवर्धन सातत्य असणे गरजेचे आहे.आपलं पर्यावरण आणि वनविभाग ते कार्य करत आहेत महापालिका त्यांना नक्कीच सहकार्य करेल. वटपौर्णिमा वटवृक्षाची लागवड करून साजरी एक नवा पायंडा आज पडला.”-महापौर रंजना भानसी

Aapla paryavaran celebrated vatapaurnima planting banyan tree nashik mayor vanarai, आपलं पर्यावरण नाशिक वनराई वटपौर्णिमा महापौर nashikonweb
वटपौर्णिमेनिमित्त आपलं पर्यावरण वटवृक्षाची लागवड करताना महापौर रंजना भानसी, शेखर गायकवाड, वनविभागाच्या डी.सी.एफ. टी ब्यूला, ए सी एफ स्वप्नील घुरे, ए सी एफ कांचन पवार, आर एफ ओ प्रशांत खैरनार.
Aapla paryavaran celebrated vatapaurnima planting banyan tree nashik mayor vanarai

Like Us On Facebook : https://www.facebook.com/NashikOnWeb/

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.