आम आदमी पार्टीचे नाशिक जिल्हा रुग्णालयात “लिंबू मिरची” प्रतीकात्मक आंदोलन

नाशिक : नाशिक जिल्हा रुग्णालयात खडे आणि रत्न पाहणाऱ्या लोकांचा मुक्त वावर आहे. यामुळे नाशिक शहर आणि वैद्यकीय क्षेत्राची मालिन झालेली प्रतिमा याचा निषेध करण्यासाठी आज आम आदमी पार्टीने “लिंबू मिरची” प्रतीकात्मक आंदोलन केले. aam aadmi party agitation civil hospital Tantrik vidya treatment

सदरहू लोकांवर कडक कारवाई करून यापुढे असे प्रकार जिल्हा रुग्णालयात होणार नाही यासाठी कठोर उपाययोजना करावी अशी मागणी नाशिक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. होले यांच्याकडे केली. निवेदन देताना आप चे कार्यकर्ते गळ्यात लिंबू मिरचीच्या मला अडकवून प्रतीकात्मक निषेध करत होते.

नाशिक जिल्हा शल्य चिकित्सक यांनी झालेला प्रकार हा चुकीचा असल्याची कबुली दिली आणि कारवाई ची प्रक्रिया सुरु झाली असल्याची माहिती दिली. तसेच लवकरात लवकर कारवाई पूर्ण करून यापुढे असा प्रकार होणार नाही अशी ग्वाही दिली. aam aadmi party agitation civil hospital Tantrik vidya treatment

याच बरोबर आप पक्षाने रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय आणि वैद्यकेतर कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असल्याची बाब डॉ. होले यांच्या निदर्शनास आणून दिली. यामुळे सर्व कर्मचारी आणि डॉक्टर याच्यावर कामाचा प्रचंड ताण असल्याचे दिसते. सरकारकडे याविषयी लवकरात लवकर पाठपुरावा करून भरती प्रकीया सुरु करावी अशी मागणी केली गेली.

आज एका बाजूला दिल्ली मध्ये आम आदमी पार्टीचे सरकार “आरोग्य” क्षेत्रात जगाला हेवा वाटेल असे काम करत असताना पुरोगामी म्हणविल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात सरकारी अनास्थेमुळे आरोग्य क्षेत्रच ICU मध्ये अशी अवस्था आहे. राज्याला आरोग्यमंत्री आहे कि नाही असा प्रश्न जनतेला पडला असून सरकारी आरोग्यव्यवस्था संपवून खासगी कॉर्पोरेट लोकांच्या हातात संपूर्ण राज्याची आरोग्य व्यवस्था देण्याचा राज्यकर्त्यांचा घाट आहे का असा सवाल उपस्थित होतो. aam aadmi party agitation civil hospital Tantrik vidya treatment

आजच्या आंदोलनात जितेंद्र भावे यांच्या नेतृत्वात जगबीर सिंग, गिरीश उगले, नितीन शुक्ल, विकास पाटील, पद्माकर अहिरे , राजेश जाधव, रफिक शेख, विनायक येवले, संतोष राऊत, प्रमोदीनी चव्हाण आणि एकनाथ सावळे आदींसह कार्यकर्ते सामील झाले.

(पत्रक प्रसिद्धी )

aam aadmi party agitation civil hospital Tantrik vidya treatment

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi,Your Name, City  or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! NashikOnWeb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.