क्रिकेट खेळताना घटणा एका 15 वर्षीय मुलाचा मृत्यू

नाशिकः सिडको परिसरात दुर्दैवी घटणा घडली आहे. या मध्ये क्रिकेट खेळताना चक्कर येऊन अवघ्या 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. श्रेयस सुधीर ढोरे, असे मृत मुलाचे नाव आहे. सिडकोतल्या रणभूमी मैदानावर श्रेयस हा क्रिकेट खेळत होता. मात्र, अचानक चक्कर आल्याने तो बेशुद्ध पडला. त्याला त्याच्या मित्रांनी तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहेत. तेव्हा डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत. श्रेयसच्या अचानक झालेल्या मृत्यूचा त्याच्या मित्रमंडळींना जबर धक्का बसला आहे. क्रिकेट खेळताना कोणताही अपघात झाली नाही. पोलिस यांनी घटनेची नोंद केली असून पुढील कायदेशीर तपास करत आहेत. nashik cricket

 

 

शेतकऱ्याचा मृत्यू

त्र्यंबक तालुक्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडली. त्यात पहिल्या घटनेत चंद्राची मेट येथे रामू रामचंद्र चंद्रे हे तरुण शेतकरी (वय 38) रानात गुरे चारत होते. दुपारी त्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत तालुक्यातील सामुंडी येथे एका झाडावर वीज कोसळली. या झाडाजवळच्या घरातील रंजना वसंत लोमटे (वय 45) व त्यांच्या तीन मुली व मुलगा यांना वीजेचा जबर झटका बसला.

त्यात रंजना थोडावेळ बेशुद्ध पडल्या. तर त्यांची नऊ वर्षांची मुलगी छायाला रुग्णालयात दाखल करावे लागले. तिची एक बाजू पूर्णतः बधीर झाली आहे, तर इतर दोन मुली अपेक्षा (वय 14) आणि अक्षरा (वय 11) यांच्या हाताला झटका पडून बेशुद्ध पडले. मात्र, त्यांची प्रकृती ठीक आहे. तिसऱ्या घटनेत अंबई माळरानावर वीज पडली. या घटनेत येथे चरणाऱ्या दहा शेळ्या जागीच ठार झाल्या. सुनील भुतांबरे यांच्या या शेळ्या होत्या. nashik cricket

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.