ylliX - Online Advertising Network

अश्वमेध क्रीडा स्पर्धेसाठी मुक्त विद्यापीठाच्या ८३ खेळांडूची निवड

मुक्त विद्यापीठाच्या केंद्रीय क्रीडा महोत्सवात खेळाडूंचे शानदार प्रदर्शन

सर्वसाधारण विजेतेपद कोल्हापूर विभागाकडे; व्हॉलीबॉलमध्ये नाशिकला उपविजेतेपद

नाशिक :  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या केंद्रीय क्रीडा महोत्सवाचा आज समारोप झाला. विविध क्रीडा प्रकारांत सांघिक आणि वैयक्तिक स्पर्धेत कोल्हापूर विभागाने आपले वर्चस्व कायम राखत जोरदार लढत देत बाजी मारली. सांघिकमध्ये विदर्भाने जोरदार लढत देत विजेतेपद पटकावले. दोन दिवस चाललेल्या एकूण १७ क्रीडा प्रकारांतून वैयक्तिक व सांघिक गटातून एकूण ८३ विद्यार्थ्यांची दापोली येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठीय अश्वमेध क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण व बहिःशाल विभागातर्फे आयोजित केंद्रीय क्रीडा महोत्सवाच्या मैदानी स्पर्धेत धावणे १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर, ८०० मीटर, १५०० मीटर, ५००० मीटर, गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी, उंच उडी, भालाफेक, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, ४ x १०० रिले, ४ x ४०० या मैदानी  स्पर्धा झाल्या. दरम्यान दोन दिवस चाललेल्या विविध स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे –

वैयक्तिक खेळ :-

तिहेरी उडी (मुले) : निखील पावले (कोल्हापूर)

तिहेरी उडी (मुली) : शामल व्यवहारे (अमरावती)

थाळीफेक मुले : अभिनंदन पाटील (कोल्हापूर)

थाळीफेक मुली : मयुरी कदम (नांदेड)

भालाफेक मुले : धम्मराज परघरमोल (अमरावती)

भालाफेक मुली : किर्ती दुकाने (कोल्हापूर)

लांब उडी मुले :  धिरज पाटील (कोल्हापूर)

लांब उडी मुली : अश्विनी जगदाळे (पुणे)

उंच उडी मुले : वीरेंद्र उज्जैनकर (अमरावती)

४ x १०० मीटर मुले : कोल्हापूर विभाग प्रथम, उपविजेता नाशिक विभाग

४ x १०० मीटर मुली : कोल्हापूर विभाग प्रथम, उपविजेता पुणे विभाग

४ x १०० मीटर मुले : कोल्हापूर विभाग प्रथम, उपविजेता नाशिक विभाग

४ x ४०० मीटर मुले :

४ x ४०० मीटर मुली : पुणे विभाग प्रथम, उपविजेता कोल्हापूर विभाग

१०० मीटर मुले : धिरज पाटील (नाशिक)

१०० मीटर मुली : प्रियांका पवार (अमरावती)

२०० मीटर मुले : प्रकाश तनगे (कोल्हापूर)

२०० मीटर मुली : सिमरन शेख (कोल्हापूर)

४०० मीटर मुले : देवेंद्र वसावे (नाशिक)

४०० मीटर मुली : सिमरन शेख (कोल्हापूर)

८००  मीटर मुले : अमित भडकमकर

८०० मीटर मुली : शारदा धाड

१५०० मीटर मुले : सुमय्या अय्युब (अमरावती)

१५०० मीटर मुली : शारदा धाड (अमरावती)

५००० मीटर धावणे मुले : विशाल तामकर (कोल्हापूर)

५००० मीटर धावणे मुली : सुमय्या अय्युब (अमरावती)

सांघिक खेळ :-

खो-खो – मुले : हा सामना नाशिक विरुद्ध नागपूर यांच्यात झाला. अटीतटीच्या लढतीत केवळ नागपूर संघाने विजयश्री खेचून आणली.

व्हॉलीबॉल – मुले : या स्पर्धेत नांदेड विभागीय केंद्राने बाजी मारली. नाशिक विभागीय केंद्राने उपविजेतेपद पटकावले.

बास्केटबॉल – मुले : हा सामना नांदेड आणि कोल्हापूरमध्ये खेळला गेला. नांदेड संघाने कोल्हापूरवर १९ गुणांची आघाडी घेऊन विजय मिळवला.

कबड्डी – मुले : अमरावती विरुद्ध नाशिकमध्ये झालेल्या या सामन्यात अमरावती संघाने विजय मिळवला.

 या दोन दिवसीय चाललेय या क्रीडा महोत्सवातून अश्वमेध क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना धावपटू कविता राऊत, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते सुवर्णपदक, रजतपदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना धावपटू कविता राऊत म्हणाली, जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास ठेवून क्रीडा क्षेत्रात कामगिरी केल्यास यश निश्चित मिळेल असे सांगून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्राकडे वळायला हवे असे आवाहन तिने यावेळी केले. यावेळी पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच विद्यापीठाची विद्यार्थिनी असलेल्या कविता राऊत हिचा आदर्श विद्यार्थ्यांनी समोर ठेऊन वाटचाल करावी असे त्यांनी सांगितले. कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. निशिगंधा पाटील आणि स्नेहा राठोड यांनी परिचय करून दिला. डॉ. विजया पाटील यांनी आभार मानले.

विजेते संघ आणि प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांची २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०१४ दरम्यान दापोली येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठीय अश्वमेध क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी केटीएचएम महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाचे संचालक प्रा. बाजीराव पेखळे, राजेंद्र मांडगे, संदीप भागवत, सुनील साळुंके, दिलीप भांडारे आदींचे विशेष सहकार्य लाभले.

शहरातील विश्वस्त, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांचा विरोध अंगावर झेलत महापालिकेच्या माध्यमातून गेल्या ११ दिवसांपासून सलग सुरू असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधी मोहिमेची इतिश्री झाली. गेल्या ११ दिवसांमध्ये महापालिका हद्दीतील रस्त्यावरील तब्बल १७४ धार्मिक स्थळे हटविण्यात आली आहेत. जुन्या नाशकातील नानावली भागातील दगडफेकीची घटना वगळता पोलिसांच्या सहकार्याने पालिकेची ही कारवाई विनाविघ्न पार पडली.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.