ylliX - Online Advertising Network

सर्वपक्षीय आणि अपक्ष असे एकूण ८२१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

सर्वपक्षीय आणि अपक्ष असे एकूण ८२१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी १२८३ वैध अर्ज ठरले होते. यामध्ये दोन दिवसात अनेकांनी माघार घेतली. यामध्ये एकूण ४६१ इच्छुक उमेदवारांनी माघार घेतली आहे. तर आता ३१ प्रभाग आणि १२२ वार्ड यामध्ये १२२ जागांसाठी सर्वपक्षीय आणि अपक्ष असे एकूण ८२१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

(सविस्तर नावांची यादी लवकरच प्रसिद्ध करणार आहोत.)

नाशिक महानगरपालिकेसाठी होत असलेल्या निवडणूकी करीता अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरांवर कारवाई करू असे सांगत अनेक ठिकाणी बंडखोरी मोडीत निघाल्याचे दिसत आहे. विशेष करून शिवसेनेत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी झालेल्या राड्यातून निर्माण झालेली बंडखोरी रोखण्यात काही अंशी यश मिळाले आहे. यात सुधाकर बडगुजर आणि भूषण देवरे यांनी माघार घेतली आहे.तर भाजपचे अधिकृत उमेदवार गोपाल पाटील, अहमद काजी आणि माकप नगरसेवक सचिन भोर यांनी माघार घेतली आहे. अनेक ठिकाणी अचानक झालेल्या माघारीमुळे आणि भाजपच्या अधिकृत उमेदवाराने शिवसेनेला दिलेल्या पाठींब्यामुळे शहरातील शिवसेनेचे पारडे जड झाले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.