ylliX - Online Advertising Network

today’s onion price कांद्याच्या भावात 700 रुपयांची वाढ, आजचा कांदा भाव

दिवाळी व सलग सुट्ट्यांमुळे १० दिवसांपासून बंद असलेले कांद्याचे लिलाव साेमवार (दि. ३१) पासून पूर्ववत झाले. सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी बाजारभावात ७०० रुपयांची वाढ झाल्याने प्रति क्विंटल तीन हजार रुपयांहून अधिक भाव मिळाला. साधारणपणे दरवर्षी दसरा-दिवाळीदरम्यान बाजारपेठेत लाल कांद्याचे आगमन होते. यंदा मात्र परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा बसल्याने शेतकऱ्यांना चार ते पाच वेळा लाल कांद्याची लागवड करावी लागली. परिणामी बाजारपेठेत अद्यापही लाल कांदा दाखल झालेला नाही. त्यामुळे सध्या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी चाळीत साठवणूक केलेला उन्हाळ कांदाच विक्रीला येत असून ताे भाव खात आहे. मात्र, पावसामुळे चाळीतील कांदाही खराब झाल्याने या भावाचा फारसा फायदा हाेणार नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. उन्हाळ कांद्यास भाव १७०० ते १८०० तर भाव २३५० रुपये मिळत होता.today’s onion price

राज्यांतून कांद्याला वाढली मागणी दहा दिवसांच्या दिवाळी व सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक मंदावली. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, पंजाब व दिल्ली या राज्यांतून मागणी वाढली. मागणीच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यातही कांद्याची आवक कमी हाेत असल्याने बाजारभावाची पातळी वाढली.

शेतमाल : कांदादर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
01/11/2022
औरंगाबाद क्विंटल 990 200 2600 1400
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 11244 2400 3400 2900
खेड-चाकण क्विंटल 550 1500 3000 2250
सातारा क्विंटल 191 1400 3200 2300
नागपूर लाल क्विंटल 1000 1000 2500 2125
पुणे लोकल क्विंटल 14347 1000 3200 2100
पुणे- खडकी लोकल क्विंटल 17 1400 1600 1500
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 5 2300 2700 2500
पुणे-मोशी लोकल क्विंटल 584 500 2500 1500
वाई लोकल क्विंटल 20 1000 3200 2200
कामठी लोकल क्विंटल 2 1500 2500 2000
नागपूर पांढरा क्विंटल 780 1000 2500 2125
चंद्रपूर – गंजवड पांढरा क्विंटल 194 2000 3200 2500
येवला -आंदरसूल उन्हाळी क्विंटल 2000 600 3080 2400
मालेगाव-मुंगसे उन्हाळी क्विंटल 13000 550 2711 2100
मनमाड उन्हाळी क्विंटल 3500 1500 2771 2400
देवळा उन्हाळी क्विंटल 7855 1200 2620 2400
today's onion price
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.