नाशिक नगर हा महाराष्ट्रातील औद्योगिक व कृषी विकासाचा संपन्न पट्टा हे. रेल्वेमार्गामुळे या दोन्ही शहरातील दळणवळण वाढून त्याला अधिक गती येणार आहे प्रस्तावित सेमी हायस्पीड रेल्वेमुळे या तीन्ही जिल्ह्यातील चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळे फाटा, संगमनेर आणि सिन्नर या भागातील महत्वाचे उद्योग, कृषी केंद्र रेल्वेमार्गामुळे जोडले जाणार आहे. २३५ कि.मी ग्रीन फील्ड सेमी हायस्पीड डबल लाईन रेल्वेमुळे अवघ्या पावणे दोन तासात हा प्रवास पूर्ण होणार आहे. द्राक्ष, कांदे, भाजीपाला,डाळिंब (नाशिक), औद्योगिक कारखाने (सिन्नर), साखर, कांदे, बटाटे, अन्नधान्य, डाळींब, दूध उत्पादन (संगमनेर), टोमॅटो, झेंडू, गुलाब, अन्नधान्य, दुध (जुन्नर-आंबेगाव), ऊस, फूड प्रोसेसिंग (खेड), कांदे, साखर, भाज्या फुले, द्राक्ष (पुणे) अशा तिन्ही जिल्ह्यातील कृषी उत्पादनाची वाहतूक सुलभ होणार आहे. nashik pune railway
=====================================================================================================
नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेसाठी २३५ किलोमीटरच्या रेल्वे मार्ग उभारणीची जय्यत तयारी सुरू झाली आहे. भूसंपादन ते नाशिकरोडला नवीन हायटेक रेल्वे स्थानकाचा प्रकल्प तयार करण्यापर्यंतचे टप्पे गाठले गेले . त्यासाठी महारेलने (महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.) बांधकाम
कपन्यांकडून ५ एप्रिलपर्यंत प्रस्ताव मागवले असून . आता नाशिक रोड या स्थानकावर ४० मजली दोन टॉवरउभे केले जाणार आहे. यात निवासस्थान, व्यावसायिक संकुल राहणार आहेत.
नाशिकरोड येथील मालधक्क्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजे रेल्वेमार्गाच्या पूर्वेला सुमारे ४० मजल्यांचे दोन टॉवर (इमारती) प्रस्तावित
दोन टॉवरमधून नाशिक-पुणेचे चार रेल्वेमार्ग जाणार , त्यावर मेट्रो धावणार असून मेट्रोचे स्थानकही येथे राहील. टॉवरमध्ये मॉल्स, रेल्वेचे कार्यालय, खासगी कार्यालय, तसेच निवासस्थानेही राहणार आहे. हे दोन्ही टॉवर तयार झाल्यानंतर नाशिक जिल्ह्याचे ते एक आकर्षण ठरणार आहे.
– हेमंत गोडसे, खासदार
हे असे होणार आहे रेल्वे स्थानक :————
{तळमजला : एकूण १८ हजार २७२ चौरस मीटरचा असून त्यात मॉल, रेस्तरंट गिफ्ट शॉप, स्टेशन कंट्रोल रूम, तिकीट कलेक्टर कार्यालय, स्वच्छता गृह, आरक्षण खिडकी, मेडिकल अशी व्यवस्था राहील.
{पहिला मजला : १९ हजार २०८ चौरस मीटरचा असून त्यात प्रतीक्षालय, दुकाने, एटीएम, तिकीट खिडकी, चौकशी खिडकी, फूड कोर्ट, किचन, स्वच्छतागृह राहील.
{दुसरा मजला : १९ हजार ७४५ चौरस मीटर जागेत म्युझियम, सभागृह, लायब्ररी, दोन सिनेमागृह, प्रदर्शन हॉल, व्यायामशाळा, दोन स्वच्छतागृह राहील.
{तिसरा मजला : १२ हजार ६७२.१२ चौरस मीटर जागेत शाॅप, कॅफे, प्रतीक्षालय, रेल्वे स्थानक कार्यालय, रेल्वे सपोर्ट एरिया, स्वच्छतागृह राहील.

२३ गावात भूसंपादन
जिल्ह्यातील नाशिक आणि सिन्नर अशा दोन तालुक्यातील देवळाली, विहीतगाव, बेलतगव्हाण, संसरी, नाणेगाव, (नाशिक) वडगाव पिंगळा, चिंचोली, मोह, वडझिरे, देशवंडी, पाटप्रिंपी, बारागाव पिंप्री,कसबे सिन्नर, कुंदेवाडीमजरे,मुसळगाव,गोंदे, दातली, शिवाजीनगर दोडी खुर्द आणि बुद्रुक नांदूर शिंगोटे, चास नळवंडी (सिन्नर) अशा २३ गावातून हा रेल्वेमार्ग जाणार आहे. भूसंपादनाची उद्या सोमवारी बैठक होणार आहे. भूसंपादन करावयाच्या गावाची यादी निश्चित झाली असून समृध्दी महामार्गाच्या धर्तीवर वाटाघाटीतून भूसंपादन (Land acquisition) होणार आहे.
अवघ्या पावने दोन तासात होणार प्रवास
तीन्ही जिल्ह्यातून जाणरा हा रेल्वेमार्ग २३५ किलोमीटरचा असून अवघ्या पावने दोन तासात हा प्रवास असेल. प्रति तास २०० किलोमीटर वेगाने रेल्वे धावतील. पार्सल व्हॅनची सुविधा असलेला हा रेल्वेमार्ग नाशिकला ओझर आणि पुणे विमानतळाशी जोडलेला असेल त्यामुळे कार्गो वाहतूकीशी जोडला जाणार आहे. नाशिक रोड, शिंदे, मोहदरी, सिन्नर, दोडी, पलसखेडे, सोनेवाडी, संगमनेर, अंभीरे, साकूर, जांबूत, बोटा, आळे फाटा, भोरवाडी, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर, चाकण, वाघोली, केलवडी, , मांजरी, हडपसर, पुणे अशा चौदा स्थानकाचा समावेश असलेल्या या रेल्वे मर्गावर प्रवाशी वाहतूकीला गती येणार आहे. केंद्र शासन व राज्य शासनाच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाचे काम काम महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन महामंडळातर्फे होणार आहे.nashik pune railway