भल्या पहाटे मिळलेल्या अहवळांतून मालेगावात अळी 36 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात 22 पुरुष आणि 14 महिलांचा समावेश आहे. एका 9 वर्षीय बालकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याने शहरातील कोरोनाचे ढग किती दाटले आहेत हे जाणवते. संबंधित अधिकाऱ्यांनी यास दुजोरा दिला आहे. (कोरोना विस्फोट मालेगाव नाशिक)
यामुळे मालेगावातील एकूण रुग्णसंख्या 163 वर पोहोचली आहे. तर नाशिक जिल्ह्यात 185 असा आकडा सध्यातरी अधिकाऱ्यांनी दिला आहे.
मालेगावात रमजानचे पर्व सुरू असताना मूठभर नागरिक सोडले तर मालेगावकर प्रशासनाला साथ देत आहेत.
अशी आहे आकडेवारी
दि. 28 एप्रिल, 2020, वेळ : सकाळी 8:30 वाजता
नाशिक जिल्हा पॉझिटिव्ह रुग्ण : 185
मालेगाव : 163 (मृत 12+) (बरे झालेले रुग्ण : 10)
नाशिक शहर 11 (बरे झालेले रुग्ण 01)
नाशिक जिल्हा 11 (बरा झालेला रुग्ण 02) (कोरोना विस्फोट मालेगाव नाशिक)