ylliX - Online Advertising Network

साडेतीन हजार महिला मतदारांची नोंदणी

महिला दिनानिमित्त साडेतीन हजार महिला मतदारांची नोंदणी
नाशिक : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या महिलांसाठी विशेष मतदार नोंदणी कार्यक्रमात 3 हजार 867 महिला आणि 2030 पुरुष अशा अशा एकूण 5897 मतदारांची नोंदणी करण्यात आली.
नांदगाव विधानसभा मतदारसंघात 202, मालेगाव मध्य 244, मालेगाव बाह्य 177, बागलाण 635, कळवण 382, सुरगाणा 19, चांदवड 147, देवळा 226, येवला 201, सिन्नर 259, निफाड 800, दिंडोरी 451, पेठ 128, नाशिक पुर्व 498, नाशिक मध्य 536, नाशिक पश्चिम 461, देवळाली 227, इगतपुरी विधानसभा मतदारसंघात 179 आणि त्र्यंबकेश्वर येथे 125 मतदारांची नोंदणी करण्यात आली.
सर्वाधिक महिला मतदार नोंदणी बागलाण, निफाड, नाशिक, दिंडोरी आणि कळवण तालुक्यात झाली. मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी 164 मतदारांनी नमुना क्र.7 सादर केले. तर  मतदाराचे यादीतील नाव बदलण्यासाठी 671 मतदारांनी नमुना क्र.8 सादर केले. मतदारसंघांतर्गत पत्ता बदलण्यासाठी नमुना क्र.8 अ 170 मतदारांनी सादर केला. तलाठी कार्यालय तसेच तहसीलदार कार्यालयात  8 ते 10 मार्च या कालावधीत मतदार नोंदणीची व्यवस्था करण्यात आली होती.
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.