ylliX - Online Advertising Network

heat wave 3 दिवस उष्णतेची लाट, उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी काय कराल!

जळगाव (Jagaon)  जिल्ह्यात 29 मार्च ते 31 मार्च हे तीन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने (Mumbai regional air department) वर्तवली असून या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने उष्माघातापासून (heatstroke) बचाव व उपाय योजनेसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. उष्णतेच्या लाटेत उष्माघाताचा घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन पालिका प्रशासन व आरोग्य विभागात देखील सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आले असून लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांना देखील उष्णतेच्या लाटेत उपायोजना राबवण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने केले आहे. heat wave

 heat wave,
heat wave,

काय करावे

तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे.

हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.

बाहेर जातांना गॉगल्स , छन्त्री / टोपी , बुट व चप्पलचा वापर करण्यात यावा.

प्रवास करतांना पाण्याची बाटली सोबत ठेवावी.

उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा तसेच ओल्या कपडयांनी डोके, मान व चेहरा झाकावे.

शरीरातील पाण्याचा प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू पाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करण्यात यावा.

अशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावित व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात याव.

गुरांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी घ्यावे.

घरे थंड ठेवण्यासाठी पडदे , शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. रात्री खिडक्या उघडया ठेवण्यात याव्यात.
पंखे , ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे.

कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.

सूर्य प्रकाशाच्या थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सुचित करण्यात यावे.

पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा.

बाहेर कामकाज करीत असताना मध्ये मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करण्यात यावा.

गरोदर कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी.

रस्ताच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावेत आणि जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावा.

काय करु नये

लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये.

दुपारी 12.00 ते 3.30 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे.

गडद , घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.

बाहेर तापमान अधिक असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत.

दुपारी 12.00 ते 03.30 या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे. heat wave,

उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडकी उघडी ठेवण्यात यावी.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.