पंचवटी – भाजपचे नाशिक पूर्वचे माजी आमदार बाळासाहेब सानप हे सोमवारी (ता.२१) दुपारी बारा वाजता भाजपमध्ये पुनप्रवेश करत आहेत. सोमवारी मुंबईतील प्रदेश भाजप कार्यालयात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रक्षप्रवेश होत असल्याची माहिती समोर येते  .

ध्यंतरीच्या काळात सानप यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने त्याचे निमित्त साधून गिरीष महाजन यांनी भेट घेत पुर्नप्रवेशाचे बीज रोवले होते. जळगावातील बीएचआर घोटाळ्यासंदर्भात महाजन अडचणीत आल्याने प्रवेश लांबला. शिवसेनेने देखील सानप यांच्या सारखा मोहरा हातून जावू नये म्हणून मातोश्रीवर बोलावून घेताना मोठी जबाबदारी देण्याचे आश्‍वासन दिले होते.

भाजपमध्ये गिरीश महाजनांचे कट्टर समर्थक असलेल्या बाळासाहेब सानप यांनी महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवला होता. परंतु, विधान परिषद निवडणुकीत सानप यांनी पक्षाच्या भूमिकेविरोधात काम केल्याने महाजनांसह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नजरेतून ते उतरले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट कापण्यात आले. सानप यांच्याऐवजी अॅड. राहुल ढिकलेंना उमेदवारी दिली गेली.

त्यामुळे नाराज सानपांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधत विधानसभा लढवली होती. परंतु, त्यांचा पराभव झाल्यानंतर ते राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेले. शिवसेनेत पुनर्वसन होईल, अशी सानप यांची अपेक्षा होती. विधान परिषदेत संधी मिळेल या आशेवर असलेल्या सानपांना विजय करंजकर यांच्या उमेदवारीने धक्का बसला. त्यामुळे त्यांनी पुन्हा भाजपची चाचपणी सुरू केली असून, महाजनांशी संपर्क वाढवला आहे. त्यामुळे सानप भाजपमध्ये जातील, अशी चर्चा सुरू झाली आहे. परंतु, सानप भाजपमध्ये आल्यास भाजपमधील सानपविरोधी गटाची कोंडी होणार असल्याने त्यांचा प्रवेश थांबला आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.