ylliX - Online Advertising Network

नाशिक मधून 23 अर्ज वैध तर 7 अवैध आणि दिंडोरी मधून 9 वैध तर 6 अवैध

नाशिक दि. 10 :- 20- दिंडोरी (अ.ज.) लोकसभा मतदार संघातून 9 अर्ज वैध व 6 अर्ज अवैध ठरविण्यात आले. तसेच 21- नाशिक लोकसभा मतदार संघातून 23 उमेदवारांचे अर्ज वैध व 7 अवैध ठरविण्यात आले आहेत. 23 applications valid Loksabha Elections 2019 Nashik Constituency Dindori

आज जिल्हाधिकारी कार्यालयात अर्जांची छानणी करण्यात आली. 20-दिंडोरी (अ.ज.) मतदार संघातून बहुजन समाज पक्षाचे अशोक त्र्यंबक जाधव, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जीवा पांडू गावित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धनराज हरिभाऊ महाले, भारतीय जनता पक्षाच्या डॉ.भारती प्रविण पवार, राष्ट्रीय मराठा पक्षाचे दादासाहेब हिरामण पवार, भारतीय ट्रायबल पक्षाचे बर्डे दत्तु काशिनाथ, वंचित बहुजन आघाडीचे बापू केळू बर्डे, अपक्ष उमेदवार अॅड टि. के. बागुल व हेमराज यमाजी वाघ या नऊ जणांचे अर्ज वैध ठरविण्यात आले आहे.

भारताचा कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) हेमंत वाघेरे, अपक्ष गाजी एतेजाद अहमद खान, राष्ट्रवादी काँग्रेसचे वैभव महाले, भारतीय ट्रायबल पक्षाचे उमेदवार बाबासाहेब दगडू बर्डे, भारतीय जनता पक्षाचे प्रविण पवार व राष्ट्रीय किसान काँग्रेस पक्षाचे शिवाजी मोरे या सहा जणांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहे.

21-नाशिक लोकसभा मतदार संघातून 23 अर्ज वैध ठरविण्यात आले आहे. त्यात बहुजन समाज पक्षाचे अॅड वैभव अहिरे, शिवसेना पक्षाचे हेमंत गोडसे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समीर मगन भुजबळ, भारतीय ट्रायबल पक्षाचे जावळे सोनिया, वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार, हिन्दुस्तान जनता पक्षाचे विनोद शिरसाठ, बहूजन मुक्ती पक्षाचे शिवनाथ कासार, बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पक्षाचे संजय घोडके तसेच अपक्ष उमेदवार म्हणून महेश झुंजार, शरद आहेर, सिंधूबाई केदार, सिमंतिनी कोकाटे, गायकर बाजीराव, देविदास सरकटे, धनंजय भावसार, प्रकाश कनोजे, प्रियंका शिरोळे, माणिकराव कोकाटे, रमेश भाग्यवंत, राजू कटाळे, विलास देसले, शरद धनराव व सुधीर देशमुख यांचे अर्ज वैध ठरले आहे.

त्याचप्रमाणे शेफाली समीर भुजबळ, शत्रुघ्न तुकाराम झोंबाड, विष्णू रामदास जाधव, रंगा महादू सोनवणे, मंगेश मनोहर ढगे, भिमराव जयराम पांडवे, शिवाजी सुभाष वाघ या एकूण सात जणांचे 21- नाशिक मधून अर्ज अवैध ठरविण्यात आले आहे.

23 applications valid Loksabha Elections 2019 Nashik Constituency Dindori
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.