ylliX - Online Advertising Network

17 ancient kund reviver गोदावरीतील १७ कुंड होणार पुनरुज्जीवित; प्रोजेक्ट गोदा अंतर्गत सर्वेक्षण सुरु

नाशिक स्मार्ट सिटीच्या प्रोजेक्ट गोदा अंतर्गत सदरचे १७ प्राचीन कुंड पुनर्जीवित करण्यासाठी सर्वेअर मार्फत कुंडांची लांबी, रुंदी, आकार तसेच कुंडांची वर्तमान स्थिती यावर आधारित सर्व्हेचा आज अखेर शुभारंभ झाला. नाशिकचे गोदाप्रेमी देवांग जानी यांच्या विशेष प्रयत्नातून हे कुड पुनरुज्जीवित होणार आहेत. 17 ancient kund reviver

17 ancient kund reviver process ssurvey project goda nashik smart city devang jani नाशिक स्मार्ट सिटी प्रोजेक्ट गोदा प्राचीन कुंड पुनरुज्जीवित 2

या कुंडांना इ. स. १७०० पासूनचा महत्वाचा इतिहास असून महापुरुषांच्या योगदानातून गोदावरी नदी पात्रात साकारले गेलेले १७ प्राचीन कुंड २००१च्या महा कुंभमेळ्याच्या निमित्ताने श्री गोदावरी नदी पत्रात झालेल्या कॉंक्रिटीकरणात लुप्त झाले होते. या कुंडांना कॉंक्रिटीकरणामुक्त करून मूळ स्वरूपात पुनर्जीवित करण्यासंबंधीचे विशिष्ट मिशन जानी यांनी २०१४ पासून हाती घेतले होते. त्यास आता काही यश मिळताना दिसत आहे.

स्मार्ट सिटी कंपनीच्या टेक्निकल रिपोर्ट आर्किटेक्ट प्राजक्ता बस्ते आणि याचिकेकर्ते देवांग जानी यांनी नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे सीईओ प्रकाश थविल तसेच नाशिक महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या समोर सादर करून पिटीपी प्रेझेन्टेशनचे सादरीकरण करण्यात आले होते. त्याची सकारात्मक दखल या द्वियींनी घेतल्याची प्रतिक्रिया जानी यांनी दिली आहे.

पुढील काळात नदी पात्रात कोर कटिंग करून पात्रातील कॉंक्रिटच्या थराचे मोजमाप घेतले जाणार आहे. १७ कुंडांच्या वर्तमान परिस्थितीच्या नकाशा तयार झाल्यावर सन १९१७ तील डीएलार मॅपनुसार टॅली करून नजिकच्या काळात १७ प्राचीन कुंड मूळ स्वरूपात पुनर्जीवित करण्यासंबंधीच्या प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. सदर सर्वेक्षण शुभारंभ प्रसंगी याचिकेकर्ते देवांग जानी, आर्किटेक्ट प्राजक्ता बस्ते, स्मार्ट सिटीचे सय्यद यांच्यासह अधिकारी आणि सर्वेअर उपस्थित होते.

गोदावरी नदी पात्र कॉंक्रीटीकरणमुक्त करून १७ प्राचीन कुंड मूळ स्वरूपात पुनर्जीवित करण्यासाठी २०१४ पासून उच्च न्यायालयात जनहित याचिका ते शासन-प्रशासन दरबारी सततच्या लढ्यारूपी पाठपुराव्याला आज यश येतांना दिसत आहे. नजीकच्या काळात कॉक्रीटीकरणमुक्त गोदेमुळे १७ प्राचीन कुंडांचे निर्माणकर्ते महापुरुषांना न्याय मिळणार आहे तसेच कॉक्रीटीकरणामुळे कोंडलेला गोदेच्या स्वास मोकळा होणार आहे.

देवांग जानी

17 ancient kund reviver

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.