जंपरोप स्पर्धा; राष्ट्रीय स्पर्धांमुळे एकात्मतेला बळकटी- आ. डॉ. तांबे

नाशिक : नाशिक जिल्हा जंपरोप असोसिएशन , महाराष्ट्र जंपरोप असोसिएशन, के. एन. डी. मंडळ आणि क्रीडा साधना यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकच्या कालिका मंदिर ट्रस्ट येथे मा. अण्णासाहेब पाटील चषक १५व्या राष्ट्रीय जंपरोप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उदघाटन नाशिक विभागाचे विधान परिषदेचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते झाले. 15th National Jump rope championship Nashik Sports January 2019

या स्पर्धेत २७० खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेत १२ वर्षे मुले आणि मुली आणि १४ वर्षे मुले आणि मुली अश्या चार गटात स्पर्धा होणार असून यामध्ये सिंगल रोप ३० सेकद स्पीड, ३० सेकद डबल अंडर, ३० सेकद ट्रिपल अंडर, ३ मिनिट इंडूरन्स,  सिंगल रोप फ्री स्टाईल तर टीम इव्हेंटमध्ये डबल अंडर रिले, डबल डच, पेअर व्हील, आणि टीम फ्री स्टाईल अश्या वेवेगळ्या प्रकाराचा समावेश आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जंपरोप फेडेरेशन ऑफ इंडियाच्या सी. ई. ओ. श्रीमती सुनीता जोशी, सरचिटणीस अभिषेक जोशी, तांत्रिक समिती प्रमुख हर्षद मोहम्मद, केशव अण्णा पाटील, छत्रपती पुरस्कार प्राप्त अविनाश खैरनार, अशोक दुधारे, आनंद खरे, नितीन हिंगमिरे, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ. सुधीर तांबे यांनी सांगितले की, जंपरोप म्हणजेच दोरीच्या उड्या हा खेळ सर्व  खेळांचा पाया आहे. त्यामुळे हा खेळ खेळणाऱ्या खेळाडूंचा सर्वांगीण विकास होतो. या राष्ट्रीय स्पर्धेत अगदी जम्मू – काश्मीर, पॉण्डेचरी पासून ते पश्चिम बंगाल, तेलंगणा, आंध्र. तामिळनाडु, गोवा, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरयाणा, मणिपूर, दिल्ली. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश. दादरा – नगर हवेली, आसाम, महाराष्ट्र अश्या भारताच्या सर्व राज्यांच्या खेळाडूंच्या सहभागामुळे आपल्या देशाची एकात्मता आणखी मजबूत होण्यास मदत होते असे सांगितले.

आजच्या स्पर्धेचा निकाल :-   

१२ वर्षातील मुले – ३० सेकंद स्पीड :-

१) नकुल उफाद (महाराष्ट्र) – प्रथम

२) थिरुचीनांद्रा (पॉण्डेचरी) – दुसरा क्रमांक

३) अजीम रहमेन (मणिपूर) – तिसरा क्रमांक

१२ वर्षातील मुले – ३ मिनिट इंडूरन्स :-

१) आदित्य मालवीमार  (मध्य प्रदेश) – प्रथम

२)  नकुल उफाद (महाराष्ट्र) – दुसरा क्रमांक

३) विराज काळे (महाराष्ट्र) – तिसरा क्रमांक

 १२ वर्षातील मुली – ३ मिनिट इंडूरन्स :-

१) उषा सोळंकी (मध्य प्रदेश) – प्रथम

२)  वृषाली पावस (महाराष्ट्र) – दुसरा क्रमांक

३)  सिद्धी शिंदे (महाराष्ट्र) – तिसरा क्रमांक

१४ वर्षातील मुली – ३ मिनिट इंडूरन्स :-

१) रुफीया मॅकक (मणिपूर) – प्रथम

२)  इशा (हरयाणा) – दुसरा क्रमांक

३) काफिया मिर्झा (हरियाणा) – तिसरा क्रमांक

15th National Jump rope championship Nashik Sports January 2019
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.