ylliX - Online Advertising Network

साठेबाजीविरुध्द पुरवठा विभागाचे स्टिंग ऑपरेशन; 151 दुकानांची तपासणी Civil Supply Sting Operation

नाशिक : Civil Supply Sting Operation

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात 15 एप्रिल पर्यंत लॉकडाऊनच्या परिस्थितीत जीनवनाश्यक वस्तुंची साठेबाजी व काळाबाजार होऊ नये यासाठी जिल्हा पुरवठा विभागाकडून जिल्ह्यात स्टिंग ऑपरेशन मोहीम हाती घेण्यात आली आहे.

जिल्ह्यात साठेबाजी रोखण्यासाठी भरारी पथके नेमण्यात आली आहेत. त्यापार्श्वभुमीवर जिल्ह्यातील १५१ दुकांनांची तपासणी करण्यात आली. मात्र तपासणीत काळाबाजार आढळला नाही. यापुर्वी साठेबाजी प्रकरणी धान्यविक्रिची दोन दुकाने सील करण्यात आली आहेत.

करोना संकट काळात साठेबाजीला आळा घालण्यासाठी पुरवठा विभागामार्फत स्टिंग ऑपरेशसाठी जिल्ह्यात भरारी पथके नेमण्यात आलेली आहेत. या पथकांनी ३७ दुकानांवर धाडी घालत २ दुकाने सील केली आहेत.

पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांच्या नियोजनाखाली स्टींग ऑपरेशन राबवले जात आहे. दुकानदार , होलसेल व रिटेल दुकानदार यांची तपासणी या पथकांमार्फत केली जात आहे.

नाशिक शहरातील दहा व तालुक्यातील ११, इगतपुरी ६७, निफाड ३, त्र्यंबक ९, नांदगाव ५, बागलाण ८, चांदवड २, कळवण ८, येवला २४ व सुरगाणा २ असे एकूण १५१ दुकांनांची तपासणी करण्यात आली. या ठिकाणी साठेबाजी अथवा काळाबाजार आढळून आला नाही.

जिल्ह्यातील संचारबदीच्या स्थितीचा गैरफायदा घेऊन जीवनावश्यक वस्तुंची साठेबाजी व कृत्रीम भाववाढ करणाऱ्या किराणा दुकानदार, होलसेल व रिटेल दुकानदार यांचे विरुध्द कठोर कारवाई पुरवठा विभागमार्फत करण्यात येत आहे.

जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तुंचा पुरेसा साठा आहे. तसेच कोणत्याही किराणा दुकानदार, होलसेल व रिटेल दुकानदार यांनी साठेबाजी किंवा जादा किमतीस वस्तुची विक्री करु नये, तसे केल्यास त्यांचे विरुध्द कठोर कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. Civil Supply Sting Operation

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.