नाशिक : फुले नगर परिसरात एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. दहावीच्या परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याच्या नैराश्यातून तिने आत्महत्या केली आहे. साक्षी बेंडकुळे (१६) असे विद्यार्थीनीचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 10th student suicide less marks found phule nagar panchavati nashik
शहरातील पंचवटीतील फुले नगर परिसरात साक्षी एका विद्यालयात दहावीत शिकत होती. दहावीची परिक्षा चांगली गेल्याने तिला चांगले गुण मिळतील अशी अपेक्षा होती.
शुक्रवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन दहावीचा निकाल जाहिर झाला. त्यावेळी साक्षीनेही भ्रमणध्वनीवर निकाल पाहिला. तिला ५८ टक्के गुण मिळाले होते. मात्र अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने तिला दु:ख झाले आणि दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घरात कोणी नाही हे पाहून तिने गळफास घेत आत्महत्या केली. 10th student suicide less marks found phule nagar panchavati nashik
बराच वेळ झाला दरवाजा का उघडत नाही हे पाहण्यासाठी शेजाऱ्यानी दरवाजा ठोठावला. मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर दरवाजा तोडला असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.
यावेळी बोलतांना एकनाथ बेंडकुळी यांनी निकालानंतर साक्षी नाराज होती. त्यामुळेच तिने हे टोकाचे पाऊल उचलले असेल असे सांगितले.
MSRTC Strike : नाशिकमध्ये संपला 70 टक्के प्रतिसाद
दरम्यान नाशिकमध्ये कुठल्या ना कोणत्या कारणाने अल्पवयीन तसेच तरुण मुलामुलींमध्ये आत्महत्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे निदर्शनास येत आहे. याविषयी चिंता व्यक्त होत असून पालकांनी पाल्यांशी संवाद वाढवावा असे आम्ही NashikOnWeb तर्फे आवाहन करतो.