ylliX - Online Advertising Network

जिल्ह्यातील या MIDC एम.आय.डी.सी त १०० कोरोना पॉझिटिव्ह

दिंडोरी तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून मंगळवारी (दि.२८) पालखेड येथील औषध कंपनीत ४४ कामगार पॉझिटिव्ह निघाले होते. आता लखमापूर येथे सिमेंट पत्रे व सीट बनविणाऱ्या कंपनीत सहा कामगारांपाठोपाठ तब्बल ४७ कामगार पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे दोन दिवसात तालुक्यातील कंपन्यांमध्ये बाधित कामगारांनी शतकपूर्ण केलं आहे.
लखमापूर औद्योगिक वसाहती मधील सिमेंट पत्रे बनविणाºया एका कंपनीत सोमवारी (दि.२८)सहा कामगार पॉझिटिव्ह आले होते. त्या पाठोपाठ तब्बल ४७ कामगार पॉझिटिव्ह आले. त्यात तालुक्यातील ६ जणांचा समावेश असून दिंडोरी शहरातील ५ तर बोपेगाव येथील एक कामगारांचा समावेश आहे.


तालुका वैद्यकीय यंत्रणेने तातडीने सर्व बाधित कामगारांच्या जोखमीच्या संपर्कातील व्यक्तींना विलीगीकरन केले आहे. त्यांचे स्वब घेत तपासणीसाठी पाठवले आहे. अन्य एक कंपनीत ३अवनखेड येथील एक कंपनीत ३ तर पालखेड येथील कंपनीतील ४४ कामगार पॉझिटिव्ह असून ते सर्व नाशिक शहरातील नागरिक राहणारे आहेत.तालुक्यात दोन दिवसात १०३ कामगार पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कामगार आरोग्य प्रश्न उभा राहिला आहे.MIDC

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.